Tripti Dimri| तृप्तीला निसर्ग नेहमीच खुणावतो

तृप्तीला निसर्ग नेहमीच खुणावतो
Tripti Dimri
तृप्ती डिमरी INSTAGRAM
Published on
Updated on

नॅशनल क्रश तृप्ती डिमरी ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. 'अॅनिमल' या सिनेमाच्या यशाने ती रातोरात स्टार बनली. तिला आता 'भाभी-२' अशीही ओळख मिळाली. तृप्ती सध्या हे यश साजरे करताना दिसत आहे. दरम्यान, यशाच्या शिखरावर असतानाच तृप्तीने तिची निवृत्तीची योजना सांगितली आहे. एका मुलाखतीत तृप्ती म्हणाली की, मी उत्तराखंडच्या पहाडी भागातील आहे. मला डोंगराळ भाग आणि निसर्ग खूप खुणावतो. मी तिथे खूप आनंदी असते. तिथे मला घरात असल्यासारखे वाटते. तिथे जाऊन राहणे हीच माझ्यासाठी निवृत्तीची योजना असेल. मी तिकडेच जाऊन राहीन, तिथली ताजी, शुद्ध हवा, उत्कृष्ट जेवण हे सर्वकाही तिथे आहे. मला निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन राहायला आवडते. मी जर आज अभिनेत्री नसते तर नक्कीच वाईल्ड लाईफ फोटोग्राफर असते. तृप्तीने कला, लैला मजनू, बुलबुल यासारख्या सिनेमांमधून अभिनयाची छाप पाडली; पण तिला खऱ्याअर्थाने लोकप्रियता मिळाली ती 'अॅनिमल' या सिनेमामुळेच. यामध्ये तिने रणबीर कपूरसोबत न्यूड सीनही दिला होता, ज्याची खूप चर्चा रंगली. यानंतर तृप्तीचा 'बॅड न्यूज' हा सिनेमा प्रदर्शित झाला. तसेच याशिवाय तृप्तीही 'भूलभुलैय्या-३' आणि 'धडक - २' या सिनेमांतही झळकणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news