हर्षवर्धन राणे: कुरिअर बॉय, किमसोबत अफेअर…

हर्षवर्धन राणे: कुरिअर बॉय, किमसोबत अफेअर…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: डॅशिंग म्हणून ओळख असलेला बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणेने ( हर्षवर्धन राणे )  कधीकाळी कुरिअर बॉय म्हणून काम केलं होतं. हर्षवर्धनने हेल्मेट डिलीवर करण्याचे काम करत असल्याची माहिती जॉन अब्राहमने एका मुलाखतीत दिली होती. एक अभिनेता म्हणून हर्षवर्धनचं म्हणावं तसं करिअर घडलं नाही. किम शर्माच्या अफेअरनंतर तो चर्चेत आला होता.

तो नेहमी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो. तो आपले फिटनेसचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. नुकताच हर्षवर्धनने आपला वाढदिवस साजरा केला आहे.

हर्षवर्धन राणेने ( हर्षवर्धन राणे ) 'सनम तेरी कसम' या चित्रपटातून पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. यानंतर त्याने 'तैश' आणि नेटफ्लिक्सवरील 'हसीन दिलरुब्बा' या चित्रपटातून आपल्या अभिनयाची कसब दाखवली. याशिवाय त्याने आपल्या करिअरची सुरूवात तेलगू 'थाकिता थाकिता' चित्रपटापासून केली. परंतु, चित्रपटात येण्यापुर्वी तो हेल्मेट डिलिव्हर म्हणून काम करत होता. त्याचा कुरिअर बॉय ते बॉलिवूड स्टार्सपर्यंतचा प्रवास खूपच कठीण होता. त्याने खूपच मेहनतीने यश मिळवलं आहे.

हर्षवर्धन सुरूवातीचे १२ वर्ष एकट्याने मेहनत केली. परंतु, 'सनम तेरी कसम' या चित्रपटाने त्याच्या आयुष्यात चारचाँद लावले. याच दरम्यान हर्षवर्धनसोबत बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मासोबत त्याचे नाव जोडले गेले. सोशल मीडियावर दोघांच्या त्यांच्या नावाची चर्चा रंगू लागली. दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. सुरूवातीला ते दोघेही एकमेकांना डेट करत होते. परंतु, काही दिवसांनी दोघांचे ब्रेकअप झाले.

हर्षवर्धन राणेचा जन्म १६ डिसेंबर १९८३ रोजी आंध्र प्रदेशात झाला आहे. हर्षच्या वडिलांचे नाव विवेक राणे असून त्याचे कुटुंब हैदराबादमध्ये स्थायिक आहेत. हर्षवर्धनला रोहिणी नावाची एक बहिण आहे.

तेलुगू चित्रपटातून करिअरची सुरुवात

हर्षवर्धनने २०१० मध्ये तेलुगू भाषेतील 'ठकीता ठकिता' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तो 'ना इस्तम और अवुनु' मध्ये दिसला. तो सायकोलॉजिकल थ्रिलर 'माया' आणि कॉमेडी चित्रपट 'ब्रदर ऑफ बोम्मली' या चित्रपटात दिसला. याशिवाय तो 'फिदा' आणि 'बंगाल टायगर' यांसारख्या चित्रपटात त्यांनी कॅमिओ भूमिका साकारल्या आहेत.

यापूर्वी, तो संजय लीला भन्साळी याच्या गोलियों की रासलीला राम-लीला (२०१३) मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल अशी अपेक्षा होती, परंतु, अकरा महिन्यांच्या करारामुळे त्याने हा चित्रपट सोडला. त्याचे 'पलटन', तेलुगू चित्रपट 'ब्रुंदावनमिदी अंदारीडी' आगामी चित्रपट येणार आहेत.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news