The Family Man 3 Teaser: प्रतीक्षा संपली; 'फॅमिली मॅन 3' टीझर रिलीज, पहा 'श्रीकांत तिवारी' सध्या काय करतो?

जयदीप अहलावत, निम्रत कौर यांच्या भूमिकेची उत्‍सूकता राहणार
The Family Man 3 Teaser:
प्रतीक्षा संपली; 'फॅमिली मॅन 3' टीझर रिलीज(Image Source X)
Published on
Updated on

मुंबई : मनोज वाजपेयीच्या बहूप्रतिक्षीत असलेल्‍या ‘फॅमिली मॅन’ ची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. या वेबसिरीजचा ३ र्‍या भागाचा टिझर रिलीज आज झाला असून. टिझर पाहताना अंगावर रोमांच उभारतात. या टिझरमध्ये पहिल्‍या दुसऱ्या भागाचा संदर्भ देत तिसऱ्या भागाची उत्‍सुकता ताणवली आहे. प्रेक्षकांना मनोज वाजपेयींनी रंगवलेला श्रीकांत तिवारी सध्या काय करत आहे असा प्रश्न पडला आहे.

राज आणि डिके जोडीने दिग्‍दर्शीत केलेल्‍या या वेबसिरीजच्या पहिल्‍या दोन भागांना प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम लाभले आहे. आता तिसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पहिल्‍या दोन भागामध्ये मनोज वाजपेयी याने श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत अंडर कव्हर एजंट दिसून आला हाेता. एका बाजूला अंडरकव्हर राहून देशाच्या दुश्मनांना पाणी पाजणारा श्रीकांत घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना तारेवरची कसरत करताना दिसून येतो. निर्माते, दिग्दर्शक राज आणि डीके यांच्या मते श्रीकांत तिवारी हा या सीझनमध्ये अंडरकव्हर एजंट राहणार असून कुंटूंब साभांळत नवीन आव्हानांना सामोरे जाणार आहेत.

The Family Man 3 Teaser:
The Family Man ३ : प्रतीक्षा संपली! मनोज वाजपेयीचा फॅमिली मॅन ३ लवकरच येणार 

जयदीप अहलावत दिसणार खलनायकी भूमिकेत

द फॅमिली मॅन'च्या या नवीन सीझनचे लेखन दिग्‍दर्शक राज, डीके आणि सुमन कुमार यांनी केले आहे, तर संवाद सुमित अरोरा यांनी लिहिले आहेत. तिसऱ्या सिझनमध्ये राज-डिके सोबत सुमन कुमार आणि तुषार सेठ देखील त्यांच्यासोबत दिग्दर्शनात सामील झाले आहेत. हा सीझन आणखी मोठा असणार आहे. या मालिकेत जयदीप अहलावत आणि निम्रत कौर हे दोन नवीन चेहरे दिसणार आहेत. हे दोघे दोन नवीन खलनायक असून यांचा सामना यावेळी श्रीकांत तिवारीला करावा लागणार आहे, देशाच्या सीमेच्या आत आणि बाहेरून येणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठी श्रीकांतचा संघर्ष दाखवण्यात येईल. मनोज वाजपेयीबरोबरच प्रियमणी (सुचित्रा तिवारी), शरीब हाश्मी (जेके तळपदे), अलेशा ठाकूर (धृती तिवारी) आणि वेदांत सिन्हा (अथर्व तिवारी) ही मागील दोन्ही हंगामातील ही महत्त्वाची पात्रे परत दिसणार आहेत.

दरम्‍यान प्राइम व्हिडिओ इंडियाचे संचालक निखिल मधोक म्हणाले, 'द फॅमिली मॅन आज केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील प्राइम व्हिडिओवरील सर्वात कौतुक केलेली फ्रँचायझी आहे. प्रेक्षकांनी सीझन २ पाहिल्याबरोबर, आम्हाला तिसऱ्या सीझनसाठी सतत विनंती येत होती.

The Family Man 3 Teaser:
Web series : तुम्ही ‘या’ टॉप ६ वेब सीरीज पाहिल्या का?

निर्माते, दिग्दर्शक राज आणि डीके यांनी सांगितले की सीझन ३ मध्ये, श्रीकांत आणि त्याच्या टीमला अशा धोकादायक परिस्थितींना तोंड द्यावे लागेल जिथे त्यांच्या मर्यादा, नातेसंबंध आणि विश्वास या सर्वांची परीक्षा होईल. यावेळी, श्रीकांतला बदललेल्या कौटुंबिक वातावरणाचा सामना करावा लागेल. या सिझनच्या प्रदर्शनाबद्दल घोषणा केलेली नाही पण दिवाळीच्या सुमारास प्रदर्शित होण्याची शक्‍यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news