२२ वर्षांची मैत्री... पडद्यावर हिट आहे विजय-त्रिशाची जोडी, चित्रपट करतात तुफान कमाई

घिल्ली ते लिओ... 22 वर्षांपासून कायम हिट आहे विजय-त्रिशाची जोडी, जाणून घ्या सुपरहिट चित्रपटांची यादी
thalapathy vijay trisha krishnan
२२ वर्षांची मैत्री... पडद्यावर हिट आहे विजय-त्रिशाची जोडी, चित्रपट करतात तुफान कमाईfile photo
Published on
Updated on

thalapathy vijay trisha krishnan 22 years of friendship blockbuster films together udhayanidhi stalin

पुढारी ऑनलाईन : थलपती विजय आणि त्रिशा कृष्णन यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दोघांचा एकत्र आलेला पहिला चित्रपट तब्बल 22 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि तो ब्लॉकबस्टर ठरला होता. तेव्हापासून आजपर्यंत विजय आणि त्रिशाची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

अभिनेता ते नेता असा प्रवास करणाऱ्या थलपती विजयने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. साऊथ सिनेमातील सुपरस्टार थलपती विजयची गणना मोठ्या मास-ॲक्शन स्टार्समध्ये केली जाते. चित्रपटांमध्ये थलपती विजयची जोडी अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबत विशेष लोकप्रिय आहे. दोघांनी एकत्र अनेक चित्रपट केले आहेत. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांची मने जिंकत आली आहे.

चित्रपटांमध्ये हिट आहे थलपती विजय-त्रिशाची जोडी

विशेष म्हणजे सहकलाकार असण्यासोबतच थलपती विजय आणि त्रिशा कृष्णन हे खऱ्या आयुष्यातही चांगले मित्र आहेत. दोघेही एकमेकांच्या सुख-दुःखात नेहमी सोबत असतात. विजयच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाच्या प्रसंगीही त्रिशा उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच त्यांनी विजयसोबत त्याचा वाढदिवसही साजरा केला आहे.

चित्रपटांमध्येही थलपती विजय आणि त्रिशाची जोडी नेहमीच हिट ठरली आहे. चला जाणून घेऊया, दोघांनी एकत्र कोणकोणते चित्रपट केले आहेत.

'घिल्ली' (Ghilli)

थलपती विजय आणि त्रिशा कृष्णन यांनी पहिल्यांदा 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'घिल्ली' चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि तमिळ सिनेमातील लोकप्रिय चित्रपटांपैकी एक बनला. चित्रपटातील विजय आणि त्रिशाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. 2024 मध्ये या चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तो पुन्हा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला.

'तिरुपाची' (Thirupaachi)

'घिल्ली'च्या जबरदस्त यशानंतर थलपती विजय आणि त्रिशा कृष्णन यांनी 'तिरुपाची' या चित्रपटात पुन्हा एकत्र काम केले. दमदार अभिनय आणि स्क्रीन प्रेझेन्सच्या जोरावर दोघांनी पुन्हा एकदा आपली जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरवली.

'आथी' (Aathi)

दोन हिट चित्रपटांनंतर विजय आणि त्रिशा 'आथी' चित्रपटात पुन्हा एकत्र दिसले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही, मात्र विजय आणि त्रिशाची जोडी प्रेक्षकांना आवडली. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे पुन्हा एकदा ते तमिळ सिनेमातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक का आहेत, हे सिद्ध झाले.

'कुरुवी' (Kuruvi)

यानंतर विजय आणि त्रिशा 'कुरुवी' चित्रपटात पुन्हा एकत्र दिसले. हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत विजय आणि त्रिशा काही वर्षांतच चार चित्रपटांमध्ये एकत्र काम करून चाहत्यांची आवडती ऑनस्क्रीन जोडी बनले होते.

'लिओ' (Leo)

तब्बल 14 वर्षांच्या प्रदीर्घ अंतरानंतर विजय आणि त्रिशा लोकेश कनकराज यांच्या ब्लॉकबस्टर 'लिओ' चित्रपटातून पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर दिसले. या चित्रपटात त्यांची जोडी अधिक मॅच्युअर दिसली. चित्रपटाची डार्क आणि हाय-व्होल्टेज कथा पाहता त्यांची केमिस्ट्री कथेला अगदी साजेशी ठरली.

22 वर्षांनंतरही मैत्री कायम

थलपती विजय आणि त्रिशा कृष्णन जेव्हा जेव्हा पडद्यावर एकत्र आले, तेव्हा त्यांच्या जोडीने प्रेक्षकांवर एक वेगळीच छाप पाडली. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. तब्बल 22 वर्षांनंतरही विजय आणि त्रिशाची मैत्री कायम आहे. दोघेही जेव्हा एकत्र दिसतात, तेव्हा चाहत्यांचे आणि माध्यमांचे लक्ष त्यांच्याकडे हमखास वेधले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news