

पुढारी ऑनलाईन :
विजयच्या या चित्रपटाची उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये आणि चित्रपटप्रेमींमध्ये खूपच वाढली आहे. 'जन नायकगन' हा चित्रपट विजयच्या कारकिर्दीची एक नवी दिशा दर्शवेल, जो केवळ अभिनेता म्हणून त्याची ओळखच वाढवेल असे नाही तर एक नेता म्हणून त्याचे भविष्यही दर्शवेल.
तमिळ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार थलपती विजयच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विजय थलपतीचा शेवटचा चित्रपट ज्याला सुरूवातीला 'थलपती ६९' नावाने ओळखले जात होते, आता अधिकारिक स्वरूपात 'जन नायकगन' च्या नावाने ओळखला जाणार आहे. हा चित्रपट विजयच्या राजकारणात उतरण्या आधीचा शेवटचा चित्रपट असेल. निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज कुरून याची घोषणा केली आहे.
विजयने स्वत:हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून ही बातमी शेअर केली आहे. या आधी, शुक्रवारी चित्रपटाच्या प्रोडक्शन हाउसने प्रजासत्ताक दिनी या चित्रपटाच्या नावाचा खुलासा करणार असल्याचे सांगितले होते. 'जन नायकगन' तमिळ चित्रपट क्षेत्रातील या वर्षीची आतापर्यंतची मोस्ट अवेटेड मुव्ही म्हणून मानली जात आहे. प्रेक्षक या चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये विजय आपल्या चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. तो कॅज्युअल आउटफिटमध्ये दिसून येत आहे. ज्यामध्ये डेनिम शर्ट, डेनिम पँट आणि चष्मा घातलेला आहे. विजयचा हा खास अंदाज, ज्याला त्याचे चाहते थलपती स्वॅग नावाने ओळखतात.
'जन नायकगन'ची कथा विजयच्या अलिकडच्या राजकीय प्रयत्नांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. या चित्रपटात विजय 'लोकशाहीचा मशालवाहक' म्हणून दिसणार आहे, जो त्याच्या तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) पक्षाच्या लाँचिंगचे प्रतीक आहे. या चित्रपटात पूजा हेगडे, बॉबी देओल, ममिता बैजू, गौतम वासुदेव मेनन, प्रियामणी आणि प्रकाश राज यांसारखे दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
'जन नायगन'ची कथा विजयच्या राजकीय प्रवासापासून, विशेषतः पक्ष स्थापन केल्यानंतर त्याला आलेल्या संघर्षांपासून प्रेरित असल्याचे दिसते. या ज्येष्ठ तमिळ चित्रपट अभिनेत्याने अलीकडेच 'तमिलगा वेत्री कझगम' (टीव्हीके) या त्यांच्या पक्षाची सुरुवात केली आणि हा चित्रपट त्यांचा प्रवास पडद्यावर जिवंत करेल.