Vijay Film Clears Censor: तमिळनाडूचे मुख्यमंत्री पुन्हा झळकणार मोठ्या पडद्यावर... सेन्सॉरनं दिला क्लिअरन्स, रिलीजची प्रतिक्षा

Jana Nayagan Clears Censor
Jana Nayagan Clears Censorpudhari
Published on
Updated on

Jana Nayagan Clears Censor: तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचा शेवटचा चित्रपट जन नायगन हा चित्रपट गृहात झळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून विजय यांचा हा चित्रपट प्रकाश झोतात होता. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे सर्टिफिकेट मिळाले नव्हते. चाहत्यांना हा चित्रपट या वर्षाच्या सुरूवातीला रिलीज होईल अपेक्षा होती.

मात्र कधी कायदेशीर तर कधी प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाल्याने चित्रपट प्रदर्शन लांबलं. आता मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट अखेरीस चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

Jana Nayagan Clears Censor
Raja Shivaji Final BO: 'राजा शिवाजी'ची एकूण बॉक्स ऑफिस कमाई किती झाली? चित्रपटाने किती नफा कमावला?

मोठा अडथळा झाला दूर

न्यूज १८ ने दिलेल्या माहितीनुसार जन नायगन याला अ सर्टिफिकेट मिळालं आहे. त्यामुळं रिलीजसाठीच्या मोठ्या अडचणी दूर झाल्या आहे. यापूर्वी चित्रपट केंद्रीय बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या किचकट प्रक्रियेत अडकला होता. त्यांनी प्रमाणपत्र देण्याएवजी पुन्हा तपाशणी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, प्रोडक्शन हाऊसने या निर्णयाविरूद्ध कोर्टात धाव घेतली होती. मात्र नंतर त्यांनी केस मागे घेतली. आता सेन्सॉरने चित्रपट क्लिअर केला असून निर्माते लवकरच रिलीज डेट जाहीर करतील.

Jana Nayagan Clears Censor
Hai Jawani Toh Ishq Hona Hai Collection Day 11: वरूण धवन बॉक्स ऑफिसवर करोडो छापतोय... खासदार मॅडमना लाखो कमवताना फुटलाय घाम

कधी होणार रिलीज?

आता विजय यांचे चाहते त्याच्या शेवटच्या चित्रपट रिलीजसाठी फार उत्सुक आहेत. अनेक महिन्यांपासून रखडल्यामुळं सोशल मीडियावर या चित्रपटाची चांगली बझ तयार झाली होती.

जर बाकीच्या सर्व फॉर्मेलिटिज पूर्ण झाल्यानंतर जन नायगन या महिन्याच्या शेवटी रिलीज होण्याची शक्यता आहे. याबाबत निर्मात्यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही.

Jana Nayagan Clears Censor
Deol band 2 Collection: ऐतिहासिक घोडदौड! देऊन बंद २ चित्रपटानं १९ दिवसात कमावला ७० कोटी रूपयांचा गल्ला

चित्रपटाविषयी थोडं

जन नायक चित्रपट हा विजय यांचा लँडमार्क प्रोजेक्ट असून त्यांचा हा अभिनेता म्हणून शेवटचा चित्रपट असणार आहे. त्यांनी आता पूर्णवेळ राजकारणी होण्याचा निर्णय घेतला असून चित्रपट कारकिर्दीतून निवृत्ती जाहीर केली आहे. हा चित्रपट एच विनोद यांनी दिग्दर्शित केला आहे.

या चित्रपटात पूजा हेगडे, बॉबी देओल, गौतम वासुदेव मेनन, प्रकाश राज, प्रियामनी, ममिथा बैजू, नरिन आणि इतर महत्वाचे कलाकार काम करत आहेत. या चित्रपटाला अनिरूद्ध रविचंदर यांनी दिले आहे. चाहते आता अधिकृत रिलीज डेटच्या प्रतिक्षेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news