पुढारी ऑनलाईन : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलीवूडमध्ये होत असलेल्या भेदभावाबद्दल वक्तव्य केले होते. यावर आता पुन्हा अभिनेत्री तापसी पन्नू ( Taapsee Pannu ) हिने प्रियांकाच्या सुरात सूर " मिसळत बॉलीवूडमध्ये काही ग्रुपमधील अभिनेत्रींना सोडून अन्य अभिनेत्रींना कशी वागणूक मिळते यावर भाष्य केले आहे.
तापसी पन्नू ( Taapsee Pannu ) म्हणाली, कोणत्याही कलाकराचे फ्रेंड सर्कल आणि एखादा ठराविक गटाचे तुम्ही सदस्य असाल तर तत्काळ तुम्हाला चित्रपट ऑफर केले जातात. मात्र, कोणाबरोबर कोणी काम करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. यासाठी मी कोणालाही दोष देत नाही. मी केवळ करिअरचा विचार केला.
आऊटसाईडरला बॉलीवूडमध्ये आपले अस्तित्व टिकवणे खूपच कठीण होऊन बसते. मला बॉलीवूडमधील वातावरणाची आधीपासूनच माहिती होती. याठिकाणी खूप पूर्वग्रह दूषित माणस आहेत. मात्र, त्यावर विचार करून काहीही फायदा नाही. प्रत्येकाने बॉलीवूडमध्ये करिअर करण्यासाठी विचार करूनच विचार करावा मग त्याची तक्रार करण्यात काहीच अर्थ नाही. दरम्यान तापसीने बॉलीवूडमधील दहा वर्षे पूर्ण केली आहेत.