Suhasini Deshpande | ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन
Suhasini Deshpande Passed away
ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन झाले Instagram
Published on
Updated on

पुणे - आपल्या अभिनयाने नाट्य, चित्रपट, मालिकांसह नृत्य क्षेत्रावर वेगळा ठसा ज्येष्ठ उमटविणाऱ्या अभिनेत्री सुहासिनी देशपांडे (वय ८१) यांचे मंगळवारी (दि. २७) खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने आजारी होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी असा परिवार आहे. बुधवारी (दि. २८) सकाळी साडेअकरा वाजता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ७० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक भूमिका केल्या आणि आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर वेगळी छाप उमटवली.

सुहासिनी देशपांडे यांनी बेबंदशाही या नाटकामधून रंगमचावर पहिले पाऊल टाकले. यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवासही थक्क करणारा होता. त्यांनी शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका केल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news