Hashtag Tadev Lagnam : सुबोध-तेजश्री प्रधानची वेगळी लव्हस्टोरी 'हॅशटॅग तदेव लग्नम्'

सुबोध भावे-तेजश्री प्रधानची वेगळी लव्हस्टोरी 'हॅशटॅग तदेव लग्नम्'
Hashtag Tadev Lagnam
सुबोध भावे-तेजश्री प्रधानची वेगळी लव्हस्टोरी 'हॅशटॅग तदेव लग्नम्' Subodh Bhave and Tejashree Pradhan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत आणि सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांचा 'हॅशटॅग तदेव लग्नम्' हा चित्रपट येत्या २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हे पोस्टर पाहून प्रेक्षकांची चित्रपटासाठी उत्सुकता वाढली आहे.

आजच्या काळातील 'हॅशटॅग’ ही संकल्पना आणि लग्न यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन आनंद दिलीप गोखले यांनी केले असून या चित्रपटाचे निर्माते शेखर विठ्ठल मते यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान एकत्र येत आहेत.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये लग्नाच्या वेषात घोड्यावर मुंडावळ्या बांधलेला नवरदेव दिसत आहे. तर त्याच्यामागे ऑफिसच्या पेहरावात बसलेली नवरी दिसत आहे. त्यामुळे नक्की हा काय प्रकार आहे?, असा प्रश्न पोस्टर पाहून प्रथमदर्शनी प्रेक्षकांच्या मनात आला आहे. या लग्नकार्यातील धमाल तर आहेच. याशिवाय आजच्या काळातील लग्न, पिढीचे विचारही दिसणार आहेत.

चित्रपटाबाबत दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले यांनी सांगितले आहे की, "आयुष्याच्या वाटेवर लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. आत्ताची पिढी लग्न हा विषय आणि नातेसंबंधांवर काय भाष्य करते?, यावर आधारित असणारा हा चित्रपट सर्वांनाच आवडेल असा आहे. त्यामुळे या चित्रपटातील वेगळेपणा पाहण्यासाठी प्रेक्षकांना २० डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.”

Hashtag Tadev Lagnam
Tejashri Pradhan : प्रेक्षकांच्या भेटीला येतेय तेजश्री प्रधानची नवी मालिका ‘प्रेमाची गोष्ट’

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news