नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
हॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि रिॲलिटी टिव्ही शो स्टार किम कर्दाशियन (Kim Kardashian) घटस्फोट घेणार असून किमने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. किमने रॅपर कान्ये वेस्टशी ७ वर्षे संसार केल्यानंतर आता घटस्फोट घेणार आहे. किम कार्दशियनने आपल्या अर्जात ४ मुलांच्या जॉईंट कस्टडीची डिमांडदेखील केली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.
मागील ७ वर्षांपासून ते सुखी संसार करत होते. नेहमी माध्यमांसमोर त्यांना अनेकदा एकत्र आनंदाने सामोरे जाताना पाहिले आहे, पण सध्या या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा मात्र होताना दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून या दाम्पत्यांमध्ये अनेक गोष्टींना घेऊन बिनसले असल्याचे बोलले जात आहे. अनेक दिवसांपासून कान्ये वेस्ट किम आणि आपल्या कुटुंबापासून दूर राहत आहे. यावेळच्या सुट्ट्यांमध्ये कान्ये वेस्ट हा आपल्या कुंटुंबासोबत वेळ घालविण्यासाठी आला नव्हता.
किम कर्दाशियन आणि कान्ये वेस्ट यांच्या नात्यांमध्ये यापूर्वीही दुरावा निर्माण झाला होता. तेव्हा ही या दोघांचा घटस्फोट होईल अशा अफवांना ऊत आला होता. तरी दोघांनी एकमेकांना सावरुन घेतले होते. नात्यातील अडचणींना दूर करत त्यांनी अनेकदा एकत्र येत सुखी संसार करत असल्याचे दाखवून दिले होते. पण, यावेळी दोघांमधील नात्यामध्ये अधिक दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. सध्या ते दोघे ही एकत्र रहात नसल्यामुळे या गोष्टीला अधिक बळ मिळत आहे
किम कर्दाशियन आणि कान्ये वेस्ट दोघेही मोठे सेलिब्रिटी आहेत त्यांनी २०१४ मध्ये इटलीमध्ये लग्न केले होते. त्यांना चार मुले आहेत. किम कार्दशियन एक मॉडल, बिझनेसवुमन, प्रोड्युसर आणि अभिनेत्री आहे. तर कान्ये वेस्ट एक प्रसिध्द रॅपर आहे.