पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध गायिका सोनू कक्करने सोशल मीडियावर एक घोषणा करत बहीण नेहा कक्कर आणि भाऊ टोनी कक्कर यांच्याशी सर्व संबंध तोडत असल्याची एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट वाचून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, काही वेळातच तिने ती पोस्ट डिलीट केलं आहे. या घटनेमुळे चाहत्यांनी अनेक तर्क-वितर्क लावले आहेत.
सोनू कक्कर, नेहा कक्कर आणि टोनी कक्कर हे तिघेजण प्रसिद्ध गायक आहेत. अचानक सोनूने तिच्या भावंडांसोबत सर्व संबंध का तोडल्याची पोस्ट व्हायरल केल्याने सगळे संभ्रमात पडले आहेत. सोनूने गेल्या शनिवारी एक पोस्ट करून त्याच लिहिले होतं की, ‘तुम्हाला सांगताना खूपच दु:ख होतं आहे की, मी आता दोन प्रतिभावान आणि सुपरस्टार टोनी कक्कर, नेहा कक्कर यांची बहीण नाही. माझा हा निर्णय अत्यंत भावनिक वेदनांमधून आला आहे आणि आज मी खरोखरंच निराश आहे’.
ही पोस्ट वाचून सोशल मीडियावरील चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. परंतु, काही वेळीने ही सोशल मीडियावरील पोस्ट तिने डिलीट केली आहे. या घटनेवरून सोशल मीडियात असं काय घडलं की, सोनूने तिच्या बहिण- भावासोबतचे नाते तोडले?, त्यांच्यात काय तरी बिनसल्याचेही बोलले जात आहे. ही पोस्ट डिलिट केली असली तरी त्याचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
'इंडियन आयडॉल १२' आणि 'सा रे ग मा पा पंजाबी' सारख्या गाण्याचे रिॲलिटी शोचे सुत्रसंचालन सोनूने केलं आहे. यानंतर ती 'कोक स्टुडिओ इंडिया' मध्येही दिसली. 'अखियां नु रहन दे', 'अर्बन मुंडा', 'फिर तेरी बहों में', 'ओह ला ला', 'फंकी मोहब्बत' आणि 'बूटी शेक' यासह भाऊ टोनीने गायलेल्या अनेक गाण्यांना गायिकेने तिचा आवाज दिला आहे. नेहाने सोनूसोबत यातील काही गाणी गायली आहेत.
कक्कर भावंडांनी 'इन एमटीव्ही अनप्लग्ड' या शोमध्ये एकत्रित सादरीकरण केले होते. त्यांनी त्यांचा 'स्टोरी ऑफ कक्कर' हा ट्रॅक लाईव्ह गायला. याशिवाय या तिघांनी 'म्युझिक की पाठशाला'मध्ये 'मिले हो तुम हमको' हे लोकप्रिय गाणेही गायले होते.