

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि आशा भोसले यांची नात जानाई भोसले यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहे. जानाई ही एक गायिका आहे. तिने तिच्या 23 व्या वाढदिवसाचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. यातील एका फोटोत सिराज देखील तिच्यासोबत होता. या चित्रात दोघेही एकमेकांकडे पाहून हसत होते. काही वेळातच, हा फोटो इंटरनेटवर व्हायरल होऊ लागला आणि प्रेक्षकांनी अंदाज लावायला सुरुवात केली की हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत.
यानंतर जान्हवीने इंस्टाग्राम स्टोरीवर सिराजसोबतची व्हायरल झालेली पोस्ट करून त्याच्याशी असलेल्या नात्याबद्दल स्पष्टीकरण दिले, अन् त्यावर लिहिले, 'मेरे प्यार भैया'. या स्टोरीमध्ये जनाईने मोहम्मद सिराजलाही टॅग केले आहे. मग सिराजने ही स्टोरी पुन्हा शेअर केली आणि लिहिले, 'माझ्या बहिणीसारखी दुसरी बहीण नाही.' मी तिशिवाय कुठेही राहू शकत नाही. जसा चंद्र ताऱ्यांमध्ये असतो. माझी बहीण हजारोंमध्ये एक आहे. असे लिहित दोघांनीही पसरणाऱ्या अफवांवर रोक लावली आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी न केल्याने 30 वर्षीय मोहम्मद सिराजला टीम इंडियाच्या व्हाईट बॉल संघातून वगळण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी सिराजला संघात स्थान देण्यात आले नव्हते. पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही सिराजला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. त्याच्यावर अर्शदीप सिंगला संधी देण्यात आली.
मोहम्मद सिराजने आतापर्यंत भारतीय संघासाठी 36 कसोटी, 44 एकदिवसीय आणि 16 टी-२० सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 100, एकदिवसीय सामन्यात 71 आणि टी20 मध्ये 14 विकेट्स आहेत.