

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर म्हणजे, ३० मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. मात्र, रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी चित्रपटाने कमाईच्या बाबतीत फार कमी अपेक्षा केली. तर दुसऱ्या दिवशीच्या ईदच्या सुंट्याचा चित्रपटाला थोडा फायदा झाला. दुसऱ्या दिवशी हा चित्रपट ५५ कोटींच्या घरात पोहोचला आहे.
सॅकनिल्कच्या माहितीनुसार, अभिनेता सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट ३० मार्चला चित्रपट गृहात दाखल झाला. या चित्रपटाची पहिल्या दिवशी म्हणावी तशी ओपनिंग मिळाली नाही. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कमाई कमी झाली. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ३० कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी ईदच्या विकेंट आणि ईदच्या चित्रपटाला थोडा फायदा झाला. दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजेपर्यंत, चित्रपटाने जगभरात सर्व भाषांमध्ये २९ कोटी रुपये कमावले. यानंतर चित्रपटाचे एकूण कलेक्शन ५५. १ कोटी रुपयांच्या घरात पोहोचले.
तर मंगळवार, १ एप्रिल रोजी म्हणजे, तिसऱ्या दिवशी सकाळी ८:३१ वाजेपर्यंत १ लाख रुपयांची कमाई केली. याशिवाय या चित्रपटाचे अजूनही आकडे वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सिकंदर चित्रपटाने पहिल्या दिवशी विक्की कौशलच्या 'छावा' किंवा स्वत:च्या कोणत्याच चित्रपटाचे मागे टाकले नाही.