

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने तिचा बॉयफ्रेंड लेखक-सिनेमॅटोग्राफर राहुल मोदीसोबत तिच्या पहिल्या चित्रपटाला दुजोरा दिला आहे. हा चित्रपट स्टार्टअप्सच्या जगावर आधारित आहे. दरम्यान, विठाबाई नारायणगावकर यांच्या बायोपिकच्या शूटिंगवेळी पायाला दुखापत झाल्याने तिला पायाला प्लॅस्टर घालावे लागलेे आहे. तिने सोशल मीडियातून ही माहिती दिली. दरम्यान, चित्रपटांविषयी बोताना श्रद्धा म्हणाली की, ‘मी आधीच एका चित्रपटासाठी शूटिंग पूर्ण केले आहे.
त्याची अधिकृत घोषणा अजून झाली नाही, त्यामुळे मी त्याबद्दल जास्त काही सांगू शकत नाही; पण घोषणा लवकरच होईल. त्यानंतर मी राहुलचा चित्रपट करणार आहे. या चित्रपटाबद्दल मी निश्चिंतपणे बोलू शकते. हा चित्रपट स्टार्टअप्सच्या जगाभोवती फिरतो. माझ्यासाठी ही एक नवीन प्रकारची भूमिका आहे, जी मला कलाकार म्हणून आव्हान देईल. मी आता फक्त अशाच स्क्रिप्टस् निवडते जे चित्रपट मला खरोखरच करावेसे वाटतात.’ दरम्यान, श्रद्धाने ‘झूटोपिया 2’ या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीत जुडी हॉप्स या पात्राला आवाज दिला आहे. हा चित्रपट भारतात 28 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा 2016 मध्ये ऑस्कर जिंकणार्या झूटोपिया या चित्रपटाचा सिक्वेल आहे.