

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांचा 'स्त्री २' हा धमाकेदार चित्रपट आज स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर म्हणजे, १५ ऑगस्टला चित्रपट गृहात प्रदर्शित झाला. दोन दिवसांपूर्वी या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमधून जोरदार कमाई केली होती. आता या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४० कोटींचा ( Stree 2 Box office collection ) टप्पा पार केला आहे. या चित्रपटाला स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीची फायदा झाल्याचे बोलले जात आहे.
रिपोर्टच्या माहितीनुसार, श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार रावच्या धमाकेदार 'स्त्री २' चित्रपटाने आज सकाळपासूनच बॉक्स ऑफिसवर भरघोष अशी कमाई करण्यास सुरूवात केली. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४० कोटींहून अधिक कमाई करत बॉक्स ऑफिसवर ओपनर बनण्याकडे वाटचाल केली आहे. या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमधून आधीच २३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
याशिवाय आजचा स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टी (१५ ऑगस्ट)सोबत विकेंट रविवारची आणि रक्षाबंधानाची सुट्टीचा फायदा या चित्रपटाला होणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पुढील काळात आणखीण चित्रपटाची कमाई वाढण्याची शक्यता आहे.