

Shraddha Kapoor fitness : बॉलिवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर कायमच चर्चेत असते. तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांसह सोशल मीडियावरही ती नेहमी अॅक्टिव्ह असते.
फॅशन सेन्ससाठी ओळखली जाणारी श्रद्धा आपल्या फोटोसह विविध रंजक व्हीडिओंनी आपल्या चाहत्यांना नेहमी खूश करत असते.
सोशल मीडियावर पोस्ट करत असते. भारतीय आणि पाश्चात्य अशा दोन्ही पोशाखांमध्ये ती तेवढीच क्युट दिसते. आताही तिने एक खास व्हीडिओ 'कू'वर पोस्ट करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
श्रद्धा कायमच फिटनेस फ्रिक राहिली आहे. आत्ता पोस्ट केलेल्या व्हीडिओमध्ये श्रद्धा मेहनतीने अवघड वर्कआऊट करताना दिसते आहे. व्यायामाचे अतिशय आव्हानात्मक प्रकार ती लीलया करते आहे. या व्हीडिओला तिने #TuesdayWorkout #Workout #sweatitout #kookiyakya असे हॅशटॅग्जही दिले आहेत.
काही काळापूर्वीच श्रद्धा कपूरने केलेल्या विधानामुळे ती चर्चेत आली होती. ती म्हणाली होती, की खासगी आयुष्याबद्दल बोलल्याने माझे लक्ष कामातून हटत नाही. मात्र पुढे ती असेही बोलली, की मी मुळात माझ्या खासगी आयुष्याबाबत फार काही कधी बोलत नाही.
सध्या श्रद्धा कपूर दिल्लीमध्ये शुटिंग करते आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर दीर्घ काळाने शुटिंग करायला मिळते आहे. म्हणून ती खूप खूश असल्याच्या भावनाही तिने एका मुलाखतीत व्यक्त केल्या. काही काळापूर्वीच चर्चा होती, की ती सध्या फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ याला डेट करते आहे.