मुंबई : पुढारी ऑनलाईन
जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक जे लॉयल नसतात आणि दुसरे जे लॉयल असल्याचा आव आणतात. याचाच अर्थ या जगात completely लॉयल कोणीचं नसतं, असंच काहीसं चित्र या वेब सीरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. रिलेशनशिपमध्ये दोन्ही बाजू जर लॉयल असतील तर ते रिलेशन खूप चांगलं टिकतं असं म्हणतात. निखिल रायबोले, भूपेंद्रकुमार नंदन यांची वन बाय टू ही मराठी वेब सीरीज १९ नोव्हेंबरपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. या वेब सिरीजचे लेखन निशांत गजभे आणि रोहित निकम यांनी केले असून दिग्दर्शक निशांत गजभे आहे.
'वन बाय टू' वेब सीरीजमध्ये रोहित निकम, शिवानी सोनार, अनामिका डांगरे, श्रेयस गुजार, आदित्य हविले, आरोही वकील, रवींद्र बंदगार आणि अभय महाजन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या वेब सीरीजच्या माध्यमातून 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेतील अभिनेत्री शिवानी सोनार डिजिटल विश्वात पदार्पण करत आहे. एक वेगळ्या आणि आकर्षक अशा भूमिकेत शिवानी सोनार दिसणार आहे.