

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेमाला वय नसते, असे म्हटले जात असले, तरी त्याबाबत काही मर्यादाही पाळण्याची गरज असते. केवळ पैशांसाठी अनेक अभिनेत्रींनी आपल्यापेक्षा खूपच मोठ्या वयांच्या कलाकारांसोबत नाते जोडले होते; पण त्यावर त्यांना टीकेला सामोरे जावे लागले. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे शिवांगी वर्मा होय. शिवांगीने ७० वर्षीय प्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे. पण, यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
शिवांगी म्हणाली की, प्रेमाला वय कळत नाही आणि मर्यादाही! शेअर केलेल्या फोटोत शिवांगी ही गोविंद नामदेव यांच्या खांद्यावर हात ठेवून उभी आहे. ज्या पद्धतीने शिवांगीने भावना व्यक्त केल्या आहेत, त्यामुळे ते रिलेशनशिपमध्ये असल्याचे मानले जात आहे. युजर शिवांगीला ट्रोल करत आहेत. म्हणूनच पैसा महत्त्वाचा आहे, अशी एकाने, तर हा तुझा बॉयफ्रेंड आहे काय? अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एकाने, तर तुम्ही दोघे लग्न करणार आहात काय? अशी तिसऱ्या एकाने, पैसा असेल तर वय नसते, मर्यादा नसते, अशी आणखी एकाने प्रतिक्रिया दिली आहे. शेअर केलेल्या फोटोला ५० हजारांहून अधिक लाईक्स् मिळाले आहेत. काहींनी शिवांगीचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले आहे. खरेतर, शिवांगीचा गोविंद नामदेव यांच्यासोबत एक चित्रपट येत आहे.