मराठमोळा शिवाजीराव दक्षिणेत कसा बनला ‘थलैवा’ 

Published on
Updated on

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

अस्‍सल मराठमोळे शिवाजीराव गायकवाड अर्थातच रजनीकांत. तमिळसोबतच हिंदी चित्रपटांतूनही रजनीकांत यांनी अफाट लोकप्रियता मिळवली. त्‍यांचा जन्‍म १२ डिसेंबर, १९५० या दिवशी बंगळूर येथे एका मराठी कुटुंबात झाला. त्‍यांचे वडील रामोजीराव गायकवाड हे पोलिस कॉन्‍स्‍टेबल होते आणि आई गृहिणी होती. चार भावडे. रजनीकांत हे शेवटचे अपत्‍य. रजनीकांत ९ वर्षांचे असताना त्‍यांच्‍या आईचे निधन झाले. बालपणापासून खेळाची प्रचंड आवड. अभ्‍यासातही हुशार. त्‍यांच्‍या दंगेखोर स्‍वभावाला आळा बसावा म्‍हणून त्‍यांच्‍या मोठ्‍या भावाने रामकृष्‍ण मठामध्‍ये नाव नोंदवलं. रजनीकांत यांनी तेथे वेदाचे शिक्षण घेतले. 

मूळचे मराठी असणारे रजनीकांत दक्षिणेत थलैवा (थलैवाचा इंग्रजी अर्थ 'लीडर' असा होतो) कसे बनले, यामागील त्यांचा जीवनप्रवास जाणून घ्यायला हवा. 

लहानपणापसूनच त्‍यांनी रामकृष्‍ण मठातर्फे आयोजित सांस्‍कृतिक कार्यक्रमात भाग घ्‍यायला सुरुवात केली. अनेक नाटकांमध्‍ये आणि नृत्‍य, गाण्‍याच्‍या कार्यक्रमात प्राविण्‍य दाखवले. महाभारतावरील एका नाटकात त्‍यांना एकलव्‍याच्‍या मित्राची भूमिका करण्‍याची संधी मिळाली. ही भूमिका दुय्‍यम होती. तरीही त्‍यांनी आपली छाप सोडली. कन्‍नड कवी डी. आर. बेंद्रे यांनी रजनीकांत महानायक होणार, असे भविष्‍य वर्तवले होते. 

लहानपणापासून मेहनत घेतली 

शालेय शिक्षण सुरू असतानाच रजनीकांत यांना पोटापाण्‍यासाठी कामही करावे लागले. सुतारकाम, गवंड्‍याच्‍या हाताखाली म, ओझेवाला अशी अनेक मेहनतीची कामे त्‍यांनी लहानपणीच केली. वयाच्‍या २१ व्‍या वर्षी त्‍याने बंगळूर परिवहन वाहतूक सेवेमध्‍ये त्‍यांची कंडक्‍टर म्‍हणून नियुक्‍ती झाली. नोकरी सुरू असतानाच त्‍यांना 'टोपी मुनियप्‍पा' यांनी आपल्‍या नाटकांमध्‍ये काम करण्‍याची संधी दिली. एकेदिवशी मद्रा फिल्‍म इन्‍स्‍टिट्‍यूटची एक जाहिरात त्‍यांच्‍या वाचनात आली. त्‍याने या संस्‍थेमध्‍ये चित्रपट अभ्‍यासक्रम शिकण्‍याचे ठरवले. कुटुंबातून विरोध झाला. तथापि, त्‍यांचा मित्र राज बहाद्‍दूने पाठिंबा देऊन त्‍यांना या संस्‍थेत प्रवेश मिळवून देण्‍याचे साहाय्‍य केले. हा त्‍यांचा चित्रपट जीवनातील टर्निग पाईंट ठरला. या संस्‍थेत शिकत असताना तमिळ चित्रपट भाषा शिकण्‍याचा सल्‍ला दिला. आणि त्‍यानंतर पुढे रजनीकांत तमिळ बोलायला लागले.  

चित्रपटात एन्ट्री 

वयाच्‍या २५ व्‍या वर्षी रजनीकांत यांना १९७५ मध्‍ये चित्रपटात काम करण्‍याची संधी मिळाली. 'अपूर्वा रागंगल' असे या चित्रपटाचे नाव होते. त्‍यात त्‍यांची छोटी भूमिका होती. पण, होती ती रागीट नवर्‍याची भूमिका. हा चित्रपट कथानकामुळे वादग्रस्‍त ठरला. तीन पुरस्‍कार मिळाले. वृत्तपत्रामधून रजनीकांतच्‍या छोट्‍या पण, प्रभावी कामाचे खूप कौतुक झाले होते. त्‍यांचा दुसरा चित्रपट 'अंथुलेनी कथा' हा तेलगू भाषेत होता. नंतर त्‍यांचे 'थोडर कथाल' या नावाने तमिळ रुपानेही करण्‍यात आले. यातील त्‍यांच्‍या भूमिकेचेही कौतुक झाले. यानंतर त्‍यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. 'बालूजेनू आवरगल,' 'वय धिनीलली,' 'शिलगम्‍मा चेंपिडी' इत्‍यादी चित्रपटात त्‍यांना छोट्‍या-मोठ्‍या भूमिका मिळाल्‍या. यातील बहुतेक चित्रपट 'बालचंदर' यांनीच दिग्‍दर्शित केले होते. त्‍यामुळे रजनीकांत यांनी बालचंदर यांचा उल्‍लेख आपली आई असाच करतो. मात्र, त्‍याला पहिली सकारात्‍मक भूमिका मिळाली की मुथुरामन यांच्‍या भुवन ओरु केलवीकुरी या चित्रपटात. (१९७७) त्‍यामुळे पुढे याच जोडीने १९९० पर्यंत २५ चित्रपट एकत्र केले. 

१९७८ या एका वर्षांत त्‍यांनी २० तमिळ, तेलुगु आणि कन्‍नड चित्रपटात नायकाच्‍या भूमिका साकारल्‍या होत्‍या. हा त्‍यावेळी एक विक्रमच होता. याचदरम्‍यान, तमिळ निर्मात्‍यांनी अमिताभ बच्‍चन यांच्‍या हिंदी चित्रपटांचे तमिळ रिमेक बनवण्‍यास सुरू झाली होती. यावेळी रजनीकांत यांनी अमिताभ यांची भूमिका त्‍या-त्‍या चित्रपटात केली होती. 'नान वझवयीपेन' हा चित्रपट 'मजबूर' या नावाने हिंदी रिमेक बनला. १९८० ते ९० या १० वर्षांत रजनीकांत ३ भाषांमध्‍ये सुमारे १०० चित्रपटात प्रमुख भूमिका गाजवल्‍या. 'बिल्‍ला,' 'गरजनायी,' 'नेत्रिकन' हे चित्रपट त्‍यांनी केले. 

बॉलिवूडमध्‍ये पदार्पण 

१९८३ मध्‍ये त्‍यांनी 'अंधा कानून' या चित्रपटाद्‍वारे बॉलिवूडमध्‍ये पदार्पण केले. त्‍यानंतर 'सिगप्‍पू,' 'मनीथाम,' 'मिस्‍टर भारत,' 'वलईकरण,' 'गुरुशिष्‍यन,' 'धर्मखीन थलईवन' असे अनेक चित्रपट त्‍याने केले. इ. स. २००० पर्यंत रजनीकांत यांचा गोल्‍डन पीरियड होता. त्‍यानंतर, मात्र २००२ पासून २०१० पर्यंत फारस यश मिळालं नाही. पण, पुन्‍हा त्‍यांनी आपली लोकप्रियता टिकवून ठेवण्‍यात यश मिळवलं. 

'या' गोष्टी वाचायलाही नक्की आवडतील –

– रजनीकांत यांना सुरूवातीच्या काळात सहाय्यक खलनायक, बलात्कारी, चोर अशा भूमिका वाट्याला आल्या.

–  १९७७ साली तेलुगु चित्रपट 'शिलगम्‍मा चेंपिडी'मध्ये रजनीकांत यांना पहिली मुख्य भूमिका मिळाली.

– १९७८ पासून रजनीकांत यांच्या चित्रपटाचा सपाटा सुरू झाला. 

– १९७८ साली भैरवी या चित्रपटाने रजनीकांत यांना सुपरस्टार बनवले.

– १९८० साली डॉनचा रिमेक आल्यानंतर रजनीकांत यांना साऊथचा अमिताभ अशी ओळख मिळाली.

– मणिरत्नम यांच्यासोबतचा दलपती सिनेमा हा रजनी यांच्या आजवरच्या चित्रपटातील सर्वोत्तम सिनेमा मानला जातो. 

– रजनीकांत सुपरस्टार होण्यामागे त्याच्या भन्नाट स्टाइल्सचा वाटा मोठा आहे.

– पाय फिरवून वावटळ उठवणारा, सिगरेट पेटवण्याची स्टाईल, गळ्यातला मफलर हवेत उडवून पुन्हा गळ्यात अडकवण्याची स्टाईल, गॉगल घालण्याची स्टाईल लोकप्रिय ठरली. 

– १९८४ मध्ये अंधा कानून या चित्रपटामधून रजनीकांत यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 

– १९८५ मध्ये सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत बेवफाई या चित्रपटामध्ये त्यांनी निगेटिव्ह भूमिका साकारली.

– १९८८ साली ब्लडस्टोन नावाच्या हॉलिवूडपटात रजनीकांत यांनी काम केलं.

– १९९१ मध्ये पुन्हा अमिताभ यांच्यासोबत हम या चित्रपटामध्ये काम केलं. 

– मेरी अदालत, जॉ जॉनी जनार्दन, वफादार, गिरफ्तार, दोस्ती-दुश्मनी, खून का कर्ज, फरिश्ते, आतंक ही आतंक, फूल बने अंगारे अशा चित्रपटांमध्ये रजनीकांत यांनी दुय्यम भूमिका साकारली. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news