मुंबई : पुढारी ऑनलाईन
मराठी अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती अभिनेता आशुतोष भाकरेने काही महिन्यांपूर्वी नांदेड येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्या घटनेनंतर मयुरी देशमुख खूप खचली होती. या धक्क्यातून सावरायला तिला बरेच दिवस लागले होते. अनेकांनी सांत्वनाबरोबरचं तिला धीरदेखील दिला होता. आता मयुरीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मयुरी जे काही सांगते, ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
डॉ. शीतल आमटे यांनी ३० नोव्हेंबर, २०२० रोजी आत्महत्या केली होती. तर २० जून, २०२० रोजी आशुतोषने आत्महत्या केली होती. यानंतर मयुरीला धीर देण्यासाठी डॉ. शीतल यांनी मयुरीला स्वतः मेसेज केला होता. त्यांनी मयुरीला म्हटले होते की "मी तुझ्या मागे खंबीरपणे उभी आहे".
मयुरीने म्हटले आहे की, शीतल यांनी मला धीर दिला आणि तिच्या धीराचे कौतुकदेखील केले होते. शीतल यांनी स्वतः मयुरीला त्यांचा फोन नंबर दिला आणि तिचा नंबर देखील मागून घेतला.
डॉ. शीतल आमटे यांनी नंदनवन येथे आत्महत्या केली. त्यांच्या निधनाने पुन्हा एकदा मोठा धक्का तिला बसल्याचे तिने म्हटले आहे. दुसऱ्या व्यक्तीला इतक्या चांगल्या पध्दतीने समजावणाऱ्या, धीर देणारी व्यक्तीने स्वतः आत्महत्या केल्याने मयुरीने हा व्हिडिओ केला असावा. तुम्हाला कसलाही त्रास असेल तर तुम्ही ते कोणाजवळ तरी बोला, असे मयुरीने व्हिडिओत म्हटले आहे.