Shanaya vs Janhvi | शनाया-जान्हवीमध्ये ‘नेपो-वॉर’?

Shanaya vs Janhvi
Shanaya vs Janhvi | शनाया-जान्हवीमध्ये ‘नेपो-वॉर’? File Photo
Published on
Updated on

बॉलीवूडमध्ये नेपोटिझम हा मुद्दा नेहमीच चर्चेत राहिला आहे. अशीच एक नवी चर्चा कपूर कुटुंबातून समोर आली असून, जान्हवी कपूर आणि शनाया कपूर यांच्यात बेबनाव असल्याच्या अफवा सोशल मीडियावर जोर धरत आहेत. जान्हवी ही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माता बोनी कपूर यांची मुलगी आहे. दुसरीकडे, शनाया कपूर ही संजय कपूर आणि महीप कपूर यांची कन्या आहे.

शनायाच्या करिअरच्या सुरुवातीला अपेक्षित पाठबळ न मिळाल्यामुळे कुटुंबात नाराजी निर्माण झाल्याची चर्चा आहे. महीप या बोनी कपूरवर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. कारण, शनायाच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करताना बोनीने तिला विशेष मदत केली नाही, असा दावा केला जात आहे. रेडीटवर एका थ्रेडमध्ये एका यूजरने दावा केला की, शनायाच्या पहिल्या चित्रपटाआधीच ती बॉलीवूडमध्ये संधी शोधत होती. त्यावेळी महीपला वाटत होतं की, बोनी ‘फॅमिली कार्ड’ वापरून शनायाला मदत करतील; पण तसं झालं नाही.

बोनीचे लक्ष आपल्या मुली जान्हवी आणि खुशी यांच्या करिअरकडेच अधिक आहे, त्यामुळे शनायाला अपेक्षित पाठबळ मिळालं नाही. एका टॉप प्रोड्युसरने शनायाला नकार देताना, ती खरी नेपो किड नाही, आम्हाला फक्त खरे नेपो किडस् हवेत, इंडस्ट्रीच्या फ्रिजमध्ये उरलेले ‘बासी’ स्टारकिडस् नकोत, असे वक्तव्य केल्याचा दावा केला जात आहे. यामुळे महीप कपूर प्रचंड संतापल्या. शनायाची आगामी फिल्म ‘तू या मैं’ 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. सुहाना खान, अनन्या पांडे यांनी सोशल मीडियावर तिचं जोरदार समर्थन केलं. मात्र, जान्हवीकडून पोस्ट किंवा कमेंट दिसून आलेली नाही, हे अनेकांच्या लक्षात आलं. जान्हवी, शनाया किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे हा वाद किती खरा आहे, हे सांगणं कठीण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news