

अभिनेता सोहेल खान याला घटस्फोट दिल्यानंतरही सीमा सजदेह खान कुटुंबीयांशी जवळ आहे. नुकतेच एका मुलाखतीत सीमा तिच्या आणि सोहेलच्या नात्यावर भाष्य केले आहे. खान कुटुंबाशी असलेल्या नात्यामुळेच 'फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाईव्हस' या शोमध्ये सहभागी होता आले असल्याचे तिने सांगितले. सीमा म्हणाली की, सर्वांत पहिल्यांदा मी सांगू इच्छिते की माझ्या पूर्व पतीच्या कुटुंबीयांशिवाय मला ही संधी मिळालीच नसती. मी पहिला सिझन केला होता, त्यावेळी मी विवाहीतच होते. माझ्यासाठी ते नेहमीच माझे कुटुंब असेल. माझी दोन्ही मुले तिथे राहतात. घटस्फोट झाला म्हणजे मी त्यांच्याशी माझे नाते तोडले असे होत नाही. मी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मी एकदा माझ्या मुलाला ही गोष्ट सांगत होते. या जगात मी केवळ कोणाची आई, कोणाची पत्नी, कोणाची मुलगी म्हणून राहण्यासाठीच आले का? माझी स्वतंत्र काही ओळख नाही का?