Sara Ali Khan Kedarnath Temple Row: सारा अली खान.. आधी सनातन असल्याचं सिद्ध करा; तरच मिळणार केदारनाथांचे दर्शन

Sara Ali Khan Kedarnath Temple Row
Sara Ali Khan Kedarnath Temple Rowpudhari
Published on
Updated on

Sara Ali Khan Kedarnath Temple Row: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान ही भोलेनाथांची भक्त आहे. आपल्या बिजी शेड्युलमधून ती हमखास वेळ काढून केदारनाथला भेट देत असते. सोशल मीडियावर ती या आपल्या भक्तीमय ट्रीपचे फोटो शेअर करत असते. मात्र आता सारा अली खानला केदारनाथांचे दर्शन घेण्यावर बंधने येऊ शकतात.

बद्रीनाथ - केदारनाथ मंदिर कमिटीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी अभिनेत्री सारा अली खान जेव्हा सनातन धर्मावर त्यांची श्रद्धा आहे असं प्रमाणपत्र देतील तेव्हाच त्या केदारनाथला भेट देऊ शकतात असं सांगितलं.

Sara Ali Khan Kedarnath Temple Row
Madhi Kanifnath Yatra 2026: श्री क्षेत्र मढी येथे कानिफनाथ महाराजांचा पारंपरिक कलशारोहण सोहळा

द्विवेदी यांनी हे वक्तव्य देहराडून येथील पत्रकार परिषदेत केलं. या पत्रकार परिषदेत त्यांनी उत्तराखंड मधील चार धाम मंदिरात (गंगोत्री, यमुनोत्रीचाही समावेश) गैर सनातनींना प्रवेश नाकारण्यात आल्याचा प्रस्ताव पास झाल्याचं सांगितलं. यात केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिराचा देखील समावेश आहे.

Sara Ali Khan Kedarnath Temple Row
Madhi Kanifnath Yatra 2026: श्री क्षेत्र मढी येथे कानिफनाथ महाराजांचा पारंपरिक कलशारोहण सोहळा

या पत्रकार परिषदेवेळी त्यांना सारा अली खान बाबत प्रश्न विचारण्यात आला. सारा अली खानने अनेकेळा केदारनाथला भेट दिली आहे. याचबरोबर केदारनाथ चित्रपटात तिने प्रमुख भूमिका देखील साकारली होती. आता तिला केदारनाथमध्ये प्रवेश देण्यात येणार का असं विचारल्यावर द्विवेदी यांनी जर तिनं सनातन धर्मावर विश्वास आहे आणि ती सनातनी आहे असं प्रमाणपत्र दिलं तर तिला प्रवेश देण्यात येईल असं सांगितलं.

Sara Ali Khan Kedarnath Temple Row
Sahyadri Tiger Reserve |उदगिरीतील काळम्मादेवीच्या यात्रेला जंगलाच्या राजाची हजेरी; आढळले वाघाच्या पायाचे ठसे

द्विवेदी यांनी नियम सर्वांना सारखाच असेल असं सांगण्याचा प्रयत्न केला. जरी ती व्यक्ती कितीही प्रसिद्ध असली तरी सर्वांना नियम सारखेच असणार आहेत. द्विवेदी यांनी मंदिर प्रशासनानं प्रमाणपत्राचा फॉरमॅट तयार केला आहे. याचबरोबर मंदिर प्रशासनानं मंदिरापासून ५० ते ६० मिटर परिघात मोबाईल फोनवर बंदी घालण्याचा देखील निर्णय घेतला आहे. हा निर्णय पावित्र्य राखण्यासाठी आणि गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी घेण्यात आल्याचं सांगितलं. काही भागात फोटोग्राफी देखील करण्यास मनाई असणार आहे.

Sara Ali Khan Kedarnath Temple Row
Mahashivratri 2026 | घृष्णेश्वर दर्शन : ज्याच्या चरणी लीन झाल्याशिवाय १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा मानली जाते अपूर्ण!

मंदिर प्रशासनानं हा निर्णय यात्रेसाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्या वाढल्यानं घेतला आहे. या महिन्याच्या सुरूवातीच्या ११ दिवसात सहा लाख लोकांनी या यात्रेसाठी नोंदणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news