

Tabu Affairs Sanjay Kapoor: प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू नुकतेच एका वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत आली होती. ५३ वर्षाच्या अजून सिंगल असलेल्या तब्बूने मला पुरूषाची गरज फक्त बेडमध्ये लागते, मी सिंगल लाईफ एन्जॉय करत आहे असं वक्तव्य केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र हे वक्तव्य खरंच तब्बूनं केलं आहे की नाही याबाबत मात्र स्पष्टता नाही.
दरम्यान, या वक्तव्यानंतर चर्चेत आलेल्या तब्बूच्या रिलेशनशिप्सची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. बोनी कपूर आणि अनिल कपूर यांचे कपूर खानदान हे चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेलं खानदान समजलं जातं. बोनी आणि अनिल कपूरचा भाऊ संजय कपूर देखील चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. त्याने १९९५ मध्ये प्रेम चित्रपटातून पादर्पण केलं होतं. यावेळी या चित्रपटात तब्बू देखील होती.
चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना तब्बू आणि संजय कपूर यांचे सूत जुळले होते. मात्र त्यांचे हे नाते अल्पायुषी ठरले. संजय कपूरने याबाबतची कबुली दिली होती. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तब्बू आणि संजय कपूर यांचे नाते तुटले.
इटाईम्सला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत संजय कपूरने सांगितलं की, प्रेम चित्रपटादरम्यान त्याचा तब्बूसोबत रोमान्स सुरू होता. मात्र चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच त्यांचे नाते तुटले. संजयने तब्बूसोबत डेटिंग केल्याचे मान्य केलं होतं. त्यांनी सांगितलं की ते त्यावेळी तब्बूला डेट करत होते. मात्र चित्रपट संपत आला तोपर्यंत आम्ही दोघे एकमेकांशी बोलणेच बदं केलं.
संजय कपूर म्हणाला की, 'मी ज्यावेळी ३१ वर्षाचा होतो त्यावेळी हा चित्रपट रिलीज झाला होता. प्रेम हा चित्रपट चालला नाही. मात्र त्यानंतर चारच आठवड्यात माधुरी दीक्षित सोबतचा राजा चित्रपट रिलीज झाला अन् तो ब्लॉकबास्टर ठरला.
दुसरीकडं तब्बूने एका दुसऱ्या मुलाखतीत सांगितलं की संजय कपूरसोबत डेट करत असताना संजय कपूर महीप सोबत देखील रिलेशनमध्ये होता. त्यामुळं संजय सोबतचं आपलं नातं अत्यंत कमी वेळात संपुष्टात आलं.
संजय कपूरने १९९७ मध्ये महीप कपूरसोबत लग्न केलं होतं. या लग्नापासून दोघांना २ मुले आहेत. महीपने एका जुन्या मुलाखतीत सांगितलं की संजय आणि माझी प्रेम कहानी अत्यंत साधी होती. माझे एका व्यक्तीसोबत वन नाईट स्टँड झाले होते. त्यावेळी मला माहिती नव्हते की माझे त्याच्यासोबत लग्न होणार आहे.
महीप म्हणाली, 'मी पार्टीमध्ये न बोलवता पोहचले होते. तिथेच मी संजय कपूरला भेटले. मी पूर्णपणे नशेत होते. मी त्याच्या कुटुंबियांशी भेटले. सासू, सासरे यांच्याशी भेटले. अनिल, सुनिता, श्रीदेवी या सर्वांना भेटले. त्यावेळी पूर्णपणे नशेत होते. मात्र तरी देखील त्यांनी मला एक्सेप्ट केलं. ते म्हणाले की, अरे आपली होणारी सून किती जबरदस्त आहे. त्यांनी माझे मोकळ्या मनाने स्वागत केले होते. आम्ही दोघांनी एकमेकांना प्रपोज केलेच नाही.'
महीप पुढे म्हणाली की, आम्ही नाईट क्लबमध्ये होतो पार्टी करत होतो. संजयने सांगितलं की आपण लग्न करतोय. मी एक टकिला शॉट घेतला आणि हो म्हणून टाकलं. महीपनं सांगितलं की लग्नापूर्वी तिने संजयसोबत पाच वर्षे डेटिंग केलं. अजूनपर्यंत हे दोघे एकत्र आहेत.