संकलन- पुढारी ऑनलाईन डेस्क
कपूर फॅमिलीतील अनिल कपूर ( anil kapoor) सुपरस्टार बनले. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये त्यांनी आपला पाय रोवला आणि एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले. दुसरीकडे, याच फॅमिलीतून अनिल कपूर यांचे भाऊ संजय कपूरदेखील (sanjay kapoor) चित्रपटात उतरले. पण, त्यांचे अनिल कपूर यांच्यासारखं म्हणावं तसं करिअर घडलं नाही. खूप मोजक्या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवून दिले. दिसायला देखणे असले तरी अनिल कपूर यांच्याशी मिळताजुळता चेहरा आणि अभिनयही तसाच असल्याने प्रेक्षक वर्गाने मात्र त्यांना स्वीकारलं नाही. काही चित्रपटांमध्ये संजय यांची हेअरस्टाईल अनिल कपूर यांच्याशी मिळतीजुळती दाखवण्यात आली आहे. तर काही वेळा ते अगदी हुबेहुब अनिल यांच्यासारखा अभिनय करताना दिसले होते. चित्रपटाची कथा उत्तम असतानादेखील पुढे जाऊन त्यांचं चित्रपटातील करिअर म्हणावं तसं घडलं नाही. अनेकवेळा संजय कपूर यांची तुलना अनिल कपूर यांच्याशी झाली. आज अनिल कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे भाऊ, अभिनेते संजय कपूर यांच्याबद्दल जाणून घेऊया.
चमचमत्या दुनियेत अनेक कलाकार आपले नशीब आजमावायला येतात. पण, सर्वांनाच पूर्णपणे यश मिळाले नाही. काही जणांना खूप संघर्ष करावा लागला. तर काही जणांना अगदी सहजपणे चित्रपट मिळूनदेखील त्यांना आपले पाय इंटस्ट्रीत रोवता आले नाहीत. प्रत्येकवेळी नवनवे कलाकार येत राहतात. जुने कलाकार काही वेळा मागे पडतात. अशा वेळी कलाकारांना धैर्य ठेवणं खूपचं महत्त्वाचं ठरतं. तितकी क्षमताही अंगी असावी लागते.
संजय कपूर यांनी आपल्या २५ वर्षांच्या करिअर अनेक चढ-उतार दिसले. आपल्या आयुष्याशी संबंधित काही किस्से त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्यांनी म्हटलं होतं की, तुमचा चित्रपट हिट आहे की फ्लॉप ही गोष्ट संपूर्ण दुनियेला समजते. या गोष्टीचा दबाव प्रत्येक अभिनेत्यावर राहतो. तुम्ही तुमच्या मर्जीने या इंडस्ट्रीत काम करण्यासाठी येता. जेव्हा आपण या इंडस्ट्रीत काम करता तर आपल्याकडे प्रत्येक प्रकारचा दबाव सहन करण्याची क्षमता हवी. जर आपण पाहिलं तर आज स्टार बनणे पहिल्यापेक्षा खूप सोपं झालं आहे. कारण, चित्रपट आणि टीव्ही शिवाय आता डिजिटल प्लॅटफॉर्मदेखील आलं आहे.
संजय कपूर यांची तुलना अनिल कपूरशी
माझ्यासोबत अनेकदा असे घडले आहे की, लोकांनी माझी तुलना माझा भाऊ अनिल कपूरशी केली होती. परंतु मी त्या सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो की, आम्ही सर्व लोक आपापल्या प्रवासात आहे. मला आनंद आहे की, माझ्या भावाने इंडस्ट्रीत खूप सारं नाव कमावलं आहे. आणि मला कोणत्याही प्रकारची तक्रार राहिली नाही. जर त्याचे करिअर उत्तम होत असेल तर, माझी काहीच तक्रार नाही. होय, मी माझे काम पूर्ण प्रामाणिकपणे केले आहे. कारण, मी माझे काम प्रामाणिकपणे केले नसते तर २५ वर्षे इंडस्ट्रीत मी टिकलो नसतो. म्हणून नेहमी चांगलं काम करा आणि आशावादी बना, असे संजय कपूर म्हणाले.
संजय कपूर यांचे वडील भारत-पाकिस्तान फाळणीवेळी पेशावरहून मुंबईत राहायला आले. तेव्हा त्यांना येथे खूप स्ट्रगल करावं लागलं होतं. त्यांनी मुगल-ए-आजम चित्रपटात असिस्टेंट डायरेक्टर म्हणून कामदेखल केलं होतं. हा चित्रपट तयार होण्यास १० वर्षे लागली. त्यांच्याकडून आम्ही भावंडे खूप काही शिकलो. त्यांनी आपल्या आयुष्यात खूप यश मिळवलं नाही.
सनाया कपूरचं इंडस्ट्रीत पदार्पण
संजय कपूर यांची मुलगी सनाया कपूरने तिची चुलत बहिण जान्हवी कपूरचा चित्रपट गुंजन सक्सेना-द कारगिल गर्लमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे.
वेब सीरीजमध्ये संजय कपूर
संजय कपूर यांची वेब सीरीज The Gone Game डिजिटल प्लेटफॉर्मवर रिलीज झाला आहे. सस्पेंस आणि थ्रिलर बेस्ड या वेब सीरीजची कहाणी कोरोनाशी संबंधित दाखवण्यात आली आहे.