

सध्या आयफा पुरस्कार-२०२४ ची जोरदार चर्चा रंगली आहे. या सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरला शाहरूख खान. या सोहळ्याच्या निमित्ताने अनेक वर्षांनी शाहरूखने एका पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले आहे. या सोहळ्यात त्याने नव्या पिढीतील अभिनेत्यांसोबत चांगलीच धमाल उडवून दिली. यावेळी शाहरूख आणि विकी यांनी 'ऊ अंटवावा' गाण्यावर केलेल्या डान्सवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या मूळ गाण्यावर नाचलेली अभिनेत्री समंथा प्रभूने प्रतिक्रिया दिली आहे. या गाण्यात शाहरूख आणि विकी 'ऊ अंटवावा' गाण्याची सिग्नेचर स्टेप करताना दिसत आहेत. यावेळी समंथा अल्लू अर्जुनसोबत नाचली. अगदी तशीच स्टेप विकी आणि शाहरूखने फॉलो केली. हा डान्स बघून उपस्थित सर्वच थक्क झाले. सर्वांनी दोघांच्या या परफॉर्मन्सला दाद दिली. हा डान्स पाहून समंथाने तिच्या इन्स्टाग्रामवर या दोघांचे कौतुक केले आणि म्हणाली की, इतक्या वर्षात असे काही घडेल याची मी कल्पनाही करू शकत नाही.