Battle of Galwan | ‘गलवान‘ची रीलिजआधीच 325 कोटींची कमाई

Battle of Galwan
Battle of Galwan | ‘गलवान‘ची रीलिजआधीच 325 कोटींची कमाई
Published on
Updated on

सलमान खानने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे की, तो एक सुपरस्टार आहे. त्याच्या मागील काही चित्रपटांनी अपेक्षित कामगिरी केली नसली, तरी त्याच्या स्टारडममध्ये कसलीही कमी आलेली नाही. याचाच पुरावा त्याच्या आगामी चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’च्या प्री-रीलिज डीलमधून मिळतोय.

‘बॅटल ऑफ गलवान’ अद्याप निर्मिती टप्प्यात असताना जियो स्टुडिओजने या चित्रपटाचे सर्व हक्क तब्बल 325 कोटींना विकत घेतले आहेत. या रकमेचा समावेश म्युझिक राईटस्, सॅटेलाईट राइटस्, डिजिटल/ओटीटी राईटस्, थिएट्रिकल राईटस् या सर्व हक्कांमध्ये होतो. या डीलनंतर चित्रपटावरील पूर्ण नियंत्रण आता जियो स्टुडिओजकडे गेले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ही सर्वात मोठी प्री-रीलिज डील मानली जात आहे. करारात अशी अट आहे की चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो त्यावरून ही किंमत वाढणार किंवा कमी होणार आहे.

जर चित्रपटाने 100, 200, 300 कोटी किंवा त्यापुढील टप्पे पार केले तर जियो स्टुडिओज निर्मात्यांना आणखी पैसे देईल. उलट, जर चित्रपट अपेक्षेप्रमाणे कमाई करू शकला नाही तर डीलची किंमत कमी होईल. म्हणजेच चित्रपट सुपरहिट राहिला तर दोन्ही बाजूंना फायदा आणि फ्लॉप ठरला तर दोघांनाही तोटा. सलमानचे फ्लॉप चित्रपट सुद्धा 100 कोटींच्या आसपास कमाई सहज करतात. याच कारणामुळे दिग्दर्शक अपूर्वा लाखिया यांनी बनवलेल्या ‘बॅटल ऑफ गलवान’ बाबत स्टुडिओला प्रचंड विश्वास आहे. हा चित्रपट भारत-चीन सैनिकांमध्ये गलवान व्हॅलीतील झालेल्या हिंसक चकमकीवर आधारित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news