दो न बिनधास्त मैत्रिणी, काजोल आणि ट्विंकल खन्ना, त्यांच्या नव्या चॅट शो ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये बॉलीवूडचे दोन सुपरस्टार, आमीर खान आणि सलमान खान हजेरी लावणार आहेत. या एपिसोडमध्ये सलमानने भूतकाळातील नात्यांबद्दल आणि वयाच्या 60 व्या वर्षी वडील बनण्याच्या इच्छेबद्दल संवाद साधला.
या शोमध्ये सलमानने केवळ वडील बनण्याची इच्छा व्यक्त केली नाही, तर आतापर्यंतची नाती का अयशस्वी ठरली यावरही भाष्य केले. सलमान म्हणाला, मुलं तर मला होणारच आहेत, लवकरच. कधी ना कधी मुलं होतीलच, बघूया पुढे काय होतं. जेव्हा एक पार्टनर दुसर्या पार्टनरपेक्षा जास्त प्रगती करतो, तेव्हा नात्यात मतभेद सुरू होतात जर कोणाला दोष द्यायचा असेल, तर तो मी स्वतःलाच देईन. त्याच्या या वक्तव्यामुळे तो कदाचित सरोगसी किंवा दत्तक मुलांचा विचार करत असल्याच्या चर्चांना उधाण आले.