

पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे इथल्या घरात एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. सैफ यांच्या घरी चोर घुसला होता. सैफ आणि त्याच्या बाचाबाची झाली तेव्हा या चोराने शास्त्राने हल्ला केला आहे. सैफवर लिलावती रूगणालयात उपचार सुरू आहे. ही गोष्ट घडल्यानंतर आता कलाकार आणि त्याचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या आगोदर ही सैफ अली खानला काही वादांना तोंड द्यावं लागले आहे.
सैफ अली खान यांची तांडव या वेब सीरीजमुळे ही वादाला सामोरं जावं लागलं होतं. जेव्हा हिंदू संघटनांनी सिनेमात दाखवलेल्या काही दृष्यांचा विरोध केला होता. त्यावेळेस सैफ आणि वेब शोच्या टीमने माफी देखील मागितली होती.
२०१२ मध्ये सैफ अली खान त्याच्या परिवारासोबत एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेला असताना साऊथ आफ्रिकेच्या एका बिझनेसमनशी त्याचा वाद झाला होता. तेव्हा सैफने वादात त्याला मारलेदेखील होतं. यानंतरही सैफला पोलिस केसला सामोरं जावं लागलं होतं.
१९९८ साली हम साथ साथ हैं या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान झालेल्या काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानचा नाव घेण्यात आलं तेव्हा तिथे सैफ अली खान याचं नावही या प्रकरणात घेतलं जात होतं. या वेळी या सिनेमाच्या टीममधील अनेक कलाकारांना कोर्ट केसेसना सामोरं जावं लागलं होतं.