नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील प्रसिध्द अदाकारा आणि 'बिग बॉस १४' ची विजेती रुबीना दिलैक सध्या चर्चेत आहेत. रिॲलिटी शो जिंकल्यानंतर प्रेक्षक तिच्याविषयीजाणून घ्यायला उत्सुक आहेत. रुबीना सातत्याने प्रसारमाध्यमाशी बोलत आहे आणि सोशल मीडियावर एकानंतर एक पोस्ट शेअर केली आहे.
स्वीमिंग पूलमध्ये रुबीनाचा ग्लॅमरस अंदाज
आता रुबीनाने तिचा आणखी एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर रुबीना ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. फॅन्सकडून तिच्या या फोटोवर प्रतिक्रिया येत आहेत. या फोटोमध्ये रुबीना बिकिनी पाहून स्वीमिंग पूलमध्ये उभी राहून पोझ देताना दिसत आहे. या बिकिनी फोटोमध्ये रुबीना ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोमध्ये रुबीना स्काय ब्लू कलरच्या बिकिनीमध्ये पूलमध्ये उतरताना दिसत आहे.
फोटो शेअर करत रुबीना दिलैकने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'व्हेकेशनसाठी खूप उत्सुक आहे, एक बीच, बिकिनी आणि काही फोटोज'. याकॅप्शनसोबत तिने तिचा पती आणि अभिनेता अभिनव शुक्लालादेखील टॅग केलं आहे. यावरून असं वाटत आहे की, अभिनवसोबतचे व्हेकेशन मिस करत आहे.
फॅन्सकडून कमेंटचा वर्षाव
फॅन्स रुबीना दिलैकच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. एका फॅनने कमेंटमध्ये लिहिलंय, 'प्लीज लवकर व्हेकेशनवर जा. आम्ही तुझे सुंदर फोटो पाहायला प्रतीक्षेत आहोत.' आणखी एका फॅनने कमेंट करत लिहिलं आहे, 'बॉस लेडी'.