मुंबई: पुढारी ऑनलाईन
सोशल मीडियावर प्रख्यात अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलियाचाचा कपिलच्या शो मधील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात त्याने एक किस्सा शेअर केला असून त्या प्रसंगामुळे आपला इगो हर्ट झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हे सुंदर कपल सध्या सोशल मीडियावर ट्रेंडवर आहे.
रितेश आणि जेनेलिने 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली आहे. या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून रितेशने एक खास किस्सा शेअर केला असून त्या प्रसंगामुळे मी दुखावलो होतो असे त्याने म्हटले आहे.
काय आहे किस्सा?
रितेशने सांगितले की, आम्ही सेलिब्रेटी किक्रेट लीगचा सामना खेळत होतो. त्यावेळी दक्षिणेच्या संघातील दोन खेळांडूमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. ती अशी की, हा जेनेलियाचा पती आहे. ते मी ऐकले आणि माझा इगो हर्ट झाला. मात्र, मी महाराष्ट्रात रितेशची पत्नी जेनेलिया अशी ओळख आहे. त्यानंतर त्याला जबरदस्त उत्तर मिळाले. रितेश तू एका राज्यात असलास तरी केरळ, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये जेनेलियाचा पतीच आहेस.
एका राजकीय कुटुंबातील असणा-या रितेशला लग्नात तुम्ही सप्तपदी घेतली की शपथ घेतली असा गमतीशीर प्रश्न कपिलने या दोघांना विचारला. तेव्हा आपल्या विनोदबुद्धीसाठी ओळखला जाणारा रितेशनेही त्याला भन्नाट उत्तर दिलं. "शपथ घेतली की सरकार फक्त पाच वर्षांसाठी असते. पाच वर्षांनंतर सरकार बदलते", असे उत्तर दिले. यासोबतच येत्या काळात जेनेलियाला घेऊन आपण एक चित्रपट करणार असल्याचेही रितेशने सांगितले.