सीता भी यहाँ बदनाम हुई; महेश भट्टसोबत नाव जोडल्यानंतर रीयाची पोस्ट

Published on
Updated on

मुंबई : पुढारी ऑनलाईन

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला क्षणाक्षणाला नवे वळण लागत आहे. दरम्यान, आत्महत्या प्रकरणाच्या भोवऱ्यात अडकलेली रिया चक्रवर्ती आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांचे व्हॉटस्अ‍ॅप चॅटिंग व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या चॅटिंगनंतर भट्ट आणि रियामध्ये असणाऱ्या नात्याव प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. इतकेच नव्हे तर व्हायरल होणाऱ्या दोघांच्या फोटोने देखील चर्चेने जोर धरला. मात्र, या सर्व चर्चांना फटाकरत रियाने सीता भी यहाँ बदनाम हुई, असे म्हटले आहे.

नुकतेच महेश भट्ट आणि रिया चक्रवर्ती यांच्यातील व्हाट्सअॅप चॅट बाबतची माहिती समोर आल्यानंतर महेश भट्ट आणि रिया यांच्या नात्यावरही निशाणा साधला जात आहे. दरम्यान सुशांतसह नात्यात असतानाच रियाचे महेश भट्टसह नाव जोडले जायचे. तिला अनेकवेळा ट्रोलही केले गेले. 

या सर्वचर्चेला वैतागून रियाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत नेटीझन्सना उत्तर दिले होते. "तू कौन है, तेरा नाम है क्या? सीता भी यहां बदानम हुई" अशी कॅप्शनही तिने या फोटोला दिली आहे.

काय होते दोघांचे चॅटिंग? 

सुशांतने तिला घराबाहेर होण्यास सांगितले होते, अशी माहिती रियाने मुंबई पोलिसांना चौकशी दरम्यान दिली होती. तिच्या वडिलांना हे नाते आवडले नसल्याचे कारण तिने सांगितले होते. मात्र त्या संवादानुसार महेश भट्ट यांनीच रियाला ब्रेकअप करण्याचा सल्ला दिला होता. तसेच रियाने सुशांतच्या मानसिक आजाराबद्दल इतरांना देखील सांगितल्याचे बोलले जात आहे.

रिया चक्रवर्ती : जड अंतःकरणाने आयशा पुढे निघून गेली आहे सर… आपला शेवटचा कॉल हा एक वेक-अप कॉल होता. तुम्ही माझे एंजल आहात. तेव्हा देखील होता आणि अजूनही आहात.

महेश भट्ट : आता मागे वळून पाहू नकोस. हे शक्य बनव, जे आवश्यक आहे. तुझ्या वडिलांना यामुळे आनंद होईल.

रिया चक्रवर्ती : त्या दिवशी तुम्ही जे माझ्या वडिलांबद्दल बोललात त्यातून काहीसे धाडस मिळाले. त्याने मला स्ट्राँग होण्याची प्रेरणा मिळाली. नेहमीच खास होण्यासाठी त्यांनी तुम्हाला प्रेम आणि धन्यवाद म्हटले आहे.

महेश भट्ट : तू माझे लेकरू आहेस. मी हलके फील करतो.

रिया चक्रवर्ती : आह… माझ्या जवळ शब्द नाहीत सर, माझे अंतःकरण दाटून आले आहे. पण, तुमच्यासाठी जी फीलिंग होत आहे ती सर्वात चांगली आहे.

महेश भट्ट : धाडसी बनण्याबद्दल धन्यवाद.

रिया चक्रवर्ती : नशिबाला धन्यवाद की त्याने माझी भेट तुमच्याशी करून दिली. तुम्ही खरे आहात. आपल्या वाटा याच दिवसासाठी जुळल्या होत्या. फक्त एका चित्रपटासाठी नव्हे तर काहीतरी खूप वेगळे आहे. तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द माझ्या डोक्यात घुमतो आहे. तुमच्या अमर्याद प्रेमामुळे खूप फरक पडतो.

महेश भट्ट : हो, हो, हो. मी कामी आलो नाही तर माझ्या असण्यालाच काय अर्थ?

रिया चक्रवर्ती : तुम्ही मला पुन्हा स्वतंत्र केलात. देवाप्रमाणेच तेही आयुष्यात दुसर्‍यांदा…

महेश भट्ट : रेस्ट.

रिया चक्रवर्ती : आह शांती.

महेश भट्ट : हॅप्पी बर्थडे. (या दिवसाला महेश भट्ट रियाचा पुनर्जन्म मानत असावेत)

रिया चक्रवर्ती : हाहा-हाहा… मी स्माइल करतेय. आय लव्ह यू माय बेस्ट मॅन. तुम्हाला माझ्यावर नक्कीच अभिमान वाटेल.

महेश भट्ट : मला आधीच आहे. खरंच. तू जे केलंस, त्यासाठी गटस् हवेत. आता मागे वळू नकोस.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news