

सिनेसृष्टीत कलाकारांसोबत त्यांच्या मुलांचीही चर्चा रंगलेल असते. ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतात. अशातच अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी चर्चेत आली आहे. राशाही बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असली, तरी अजूनही तिला बराच पल्ला गाठायचा आहे. आता राशा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिचे नाव एका लोकप्रिय भारतीय क्रिकेटपटूसोबत जोडले जात आहे. तो क्रिकेटर म्हणजे २९ वर्षीय स्पिनर कुलदीप यादव आहे. राशाची सोशल मीडिया पोस्ट लाईक केल्यामुळे दोघांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. राशाने बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि डायना पेंटीसोबत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांच्या फोटोंवर कुलदीपने लाईक केले आहे.
इन्स्टाग्रामवर कुलदीप आणि राशा एकमेकांना फॉलोही करतात. यामुळेच दोघांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. पण, या चर्चावर राशा अथवा कुलदीपने अद्यापही अधिकृतरीत्या भाष्य केलेले नाही. दोघांनीही यावर मौन बाळगले आहे. राशा लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'आझाद' या सिनेमात ती झळकणार आहे. या सिनेमात सिंघम अजय देवगण प्रमुख भूमिकेत असणार आहे. हा सिनेमा १७ जानेवारी रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे.