Dhurandhar ब्लॉकबस्टर ठरल्यावर रणवीर सिंहची पहिली प्रतिक्रिया...'नजर और..' चाहत्‍यांच्या काळजाला घातला हात

‘धुरंधर’ मधील भूमिकेनंतर रणवीर सिंह सर्वत्र चर्चेत आहे. केवळ देशातच नाही तर परदेशातही हा चित्रपट जोरदार गाजत आहे.
Dhurandhar Film
Dhurandhar ब्लॉकबस्टर ठरल्यावर रणवीर सिंहची पहिली प्रतिक्रिया...'नजर और..' चाहत्‍यांच्या काळजाला घातला हातFile Photo
Published on
Updated on

ranveer singh first post dhurandhar success wrote on kismat and nazar

पुढारी ऑनलाईन :

‘धुरंधर’ मधील भूमिकेनंतर रणवीर सिंह सर्वत्र चर्चेत आहे. केवळ देशातच नाही तर परदेशातही हा चित्रपट जोरदार गाजत आहे. अशातच रणवीर सिंहचा अलीकडील एक पोस्टही चर्चेत आला आहे, ज्यात त्याने नशीब आणि नजरेवर एक अतिशय सुंदर ओळ लिहिली आहे.

Dhurandhar Film
प्रेम, वेदना आणि मौन… रेखा–अमिताभच नातं का तुटलं यावर मैत्रिणीचा मोठा खुलासा

रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ चित्रपट चित्रपटगृहांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. या विकेंडला ‘धुरंधर’ने इतकी गर्दी खेचली की तिकीट खिडकीबाहेर ‘हाऊसफुल’चे फलक लागले. भारतीय बॉक्स ऑफिससोबतच परदेशी बॉक्स ऑफिसवरही ‘धुरंधर’ कमाल करत असून, दररोज नवे-नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. ५ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ने दुसऱ्या रविवारी तर इतिहासच रचला. दुसऱ्या रविवारी चित्रपटाने ५९ कोटींची कमाई केली.

दरम्यान, रणवीर सिंहने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या एक पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘धुरंधर’च्या जबरदस्त कमाईदरम्यान रणवीर सिंग आतापर्यंत शांत होता, मात्र आता त्याने एक पोस्ट शेअर करून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

Dhurandhar Film
खजुराहो फेस्टिव्हलआधी अनुपम खेर यांना धक्का! म्हणाले, मी भडास काढू इच्छितो;

रणवीर सिंगने पोस्टमध्ये व्यक्त केली मनातील गोष्ट

‘धुरंधर’ ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर रणवीर सिंगने पहिल्यांदाच एक पोस्ट शेअर केली आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्याने नशिबाबद्दल अतिशय सुंदर विचार मांडले आहेत. रणवीरने लिहिले आहे.

“नशिबाची एक फार सुंदर सवय असते.... ते योग्य वेळी बदलते. पण सध्या मात्र, नजर आणि संयम.”

रणवीर सिंगचा ही पोस्ट पाहून चाहते असा अंदाज लावत आहेत की ही पोस्ट ‘धुरंधर’च्या यशासाठीच आहे.

रणवीर होता ब्लॉकबस्टरच्या शोधात

‘धुरंधर’पूर्वी रणवीर सिंग शेवटचा अजय देवगण स्टारर ‘सिंघम अगेन’मध्ये दिसला होता, ज्यात त्याची एक कॅमिओ भूमिका होती. त्याआधी तो ‘रॉकी आणि रानी की प्रेम कहानी’मध्ये झळकला होता, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र त्याआधी आलेले रणवीरचे तीन चित्रपट ‘८३’, ‘जयेशभाई जोरदार’ आणि ‘सर्कस’ बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले होते. त्यामुळे रणवीर बराच काळ अशा चित्रपटाच्या शोधात होता जो बॉक्स ऑफिसवर धमाका करेल, आणि अखेर ‘धुरंधर’च्या माध्यमातून त्याने इतिहास रचला आहे.

पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाची चलती

रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर’ पहिल्या दिवसापासूनच चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने २६ कोटींची कमाई केली आणि दिवसेंदिवस कमाईत वाढ होत गेली. अवघ्या ९ दिवसांत चित्रपटाने भारतात ३५० कोटी आणि जगभरात ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. यासह रणवीर सिंगने स्वतःच्या आधीच्या सर्व चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत.

चित्रपटाची मोठी लांबी अन कलाकारांचे कौतूक

३ तास ३० मिनिटे लांबीच्या या चित्रपटाची कथा आणि कलाकारांची प्रचंड प्रशंसा होत आहे. चित्रपटात रणवीर सिंगसोबत सारा अर्जुन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना आणि आर. माधवन यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय चित्रपटातील छोट्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news