Rajinikanth Diwali Wishes : सुपरस्टार रजनीकांत यांच्याकडून चाहत्‍यांना दिवाळीच्या शुभेच्छा, भरपावसात घराबाहेर चाहत्‍यांचा उत्‍साह!

दिवाळीच्या मुहूर्तावर सुपरस्टार जमलेल्या गर्दीला केले अभिवादन, 'जेलर २' च्या यशाचाही जल्लोष
Rajinikanth greets fans : सुपरस्टार रजनीकांत यांच्याकडून चाहत्‍यांना दिवाळीच्या शुभेच्छा, भरपावसात घराबाहेर चाहत्‍यांचा उत्‍साह!
Rajinikanth greets fans : सुपरस्टार रजनीकांत यांच्याकडून चाहत्‍यांना दिवाळीच्या शुभेच्छा, भरपावसात घराबाहेर चाहत्‍यांचा उत्‍साह!
Published on: 
Updated on: 

Rajinikanth greets fans outside his Chennai residence on Diwali दिवाळी सणाच्या निमित्ताने चेन्नईमध्ये सुपरस्टार रजनीकांत यांच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. रविवारी सकाळी रजनीकांत यांनी घराबाहेर पडत उपस्थित शेकडो चाहत्यांची भेट घेतली आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.नुकताच सुपरहिट झालेल्या जेलर २ मुळे चाहत्‍यांमध्ये अजून उत्‍साह जाणवत होता, अनेकजण आपल्या लाडक्या अभिनेत्‍याचे पोस्टर हातात घेऊन पावसाची तमा न करात रजनीकांत यांच्या घरासमोर उभे होते. 'थलैवा'च्या एका दर्शनाने या चाहत्यांची दिवाळी अधिकच खास ठरली.

आज रविवारी दिवाळीच्या मुहूर्तावर रजनीकांत यांचे चाहते त्‍यांच्या बंगल्यासमोर जमले होते. सध्या चेन्न्ईमध्ये वादळाचा प्रभाव जाणवत असून पाऊस सुरु आहे. आज दिवाळीच्या दिवशीही सकाळीच तेथे पाऊस सुरु झाला होता पण चाहत्‍यांचा उत्‍साह मात्र कमी झाला नाही, पोस्टर फोटो घेऊन ते उभे होते. याचेवळी सुपरस्टार रजनीकांत यांनी बाहेर येत सर्वांना नमस्कार करत अभिवादन केले. सोनेरी लुंगी व पांढराशुभ्र शर्ट अशा अस्सल दक्षिणेकडील पारंपरिक वेषात रजनीकांत यांनी चाहत्‍यांना दर्शन दिले.पावसामुळे त्‍यांचा सहायक छत्री धरुन उभा होता

रजनीकांत सध्या त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जेलर २' या चित्रपटाच्या भव्य यशाचा आनंद साजरा करत आहेत. हा चित्रपट तामिळ भाषेतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या सात दिवसांत मणिरत्नम यांच्या 'पोन्नियिन सेल्वन १' आणि लोकेश कनकराज यांच्या 'कुली' चित्रपटांच्या एकूण कमाईचे विक्रम मोडीत काढले आहेत. तसेच, हिंदीतील 'दृश्यम: द कन्क्लुजन' चित्रपटाला मागे टाकत 'जेलर २' २०२६ मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.