Raaka Guinness World Record : अल्लू अर्जुन- ॲटलीच्या ‘राका’ ने ‘अवतार’लाही टाकले मागे, थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद!

भारतातील बिग बजेट फिल्म, तब्बल १००० कोटी रुपये खर्चून बनणार दोन भाग
Raaka Guinness World Record :
Raaka Guinness World Record :
Published on
Updated on

Allu Arjun And Atlee's RAAKA साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या बहुप्रतिक्षित 'राका' या चित्रपटाने चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यापूर्वीच एक मोठा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. या चित्रपटाने थेट 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवून भारतीय चित्रपटसृष्टीची मान जागतिक स्तरावर पुन्हा एकदा उंचावली आहे. या चित्रपटात एकाचवेळी ३७ कलाकारांचे रिअल-टाईम मोशन-कॅप्चर करण्यात आले आहे. जे अवतार Avatar या जेम्स कॅमरुन यांच्या चित्रपटापेक्षा जास्त आहे. 'अवतार'च्या चित्रीकरणादरम्यान एका वेळी जास्तीत जास्त ५ ते ८ कलाकारांचेच प्रत्यक्ष एकत्र मोशन-कॅप्चर केले जायचे.

राकामध्ये एकाचवेळी 37 कलाकारांचे मोशन कॅप्चर

ॲटलीच्या या चित्रपटात एकाच सीनमध्ये एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने प्रत्यक्ष कलाकारांच्या हालचाली आणि डेटा थेट कॅप्चर केल्यामुळेच या चित्रपटाने थेट 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' प्रस्थापित केला आहे.

दिग्दर्शक ॲटली यांच्या ४० व्या वाढदिवसाचे औचित्य साधत निर्मात्यांनी या ऐतिहासिक विक्रमाची घोषणा केली. चित्रपटातील एका विशेष सीक्वेन्ससाठी एकाच वेळी ३७ कलाकारांचे मोशन-कॅप्चर (Motion-Capture) करण्यात आले. रिअल-टाईममध्ये इतक्या मोठ्या संख्येने कलाकारांचे मोशन-कॅप्चर करण्याची ही जगातील पहिलीच वेळ ठरली आहे.

अल्लू अर्जुन आणि ॲटली यांच्याकडे प्रमाणपत्र सुपूर्द

चित्रपटाची निर्मिती संस्था 'सन पिक्चर्स'ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक ॲटली यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे अधिकृत प्रमाणपत्र स्वीकारतानाचे छायाचित्रे पोस्ट करत निर्मात्यांनी लिहिले, "इतिहास घडला! भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर नेणारा हा एक जागतिक विजय आहे. 'राका'ने एकाच वेळी ३७ कलाकारांचे मोशन-कॅप्चर करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे." तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रगत मानल्या जाणाऱ्या या तंत्रज्ञानाचा भारतीय चित्रपटात अशा प्रकारे पहिल्यांदाच वापर झाल्यामुळे, 'राका' चित्रपटाविषयी प्रेक्षकांमधील उत्सुकता आता अधिकच ताणली गेली आहे.

काय आहे राका फिल्म

हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात भव्य सायन्स-फिक्शन व ॲक्शन चित्रपट आहे. यामध्ये अलू अर्जून, दिपीका पादूकोण यांच्यासह मृणाल ठाकूर, जान्हवी कपूर आणि रश्मिका मंदाना हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे बजेट १ हजार कोटी असून हा एक ॲक्शन सायन्स फिक्शन पिक्चर असणार आहे. भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट ठरत आहे. हा चित्रपट दोन वेगळ्या कालखंडांत उलगडतो — एक प्राचीन पौराणिक-वैदिक काळ आणि दुसरा आधुनिक काळ. पुनर्जन्म आणि काळाच्या प्रवासावर आधारलेली ही एक अत्यंत भव्य दृश्यप्रधान कथा आहे. पूढील वर्षी डिसेंबर २०२७ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news