पुढारी ऑऩलाईन डेस्क : 'पुष्पा २' च्या प्रिमियरवेळी झालेल्या चेंगराचेगरीप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे.
हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' चित्रपटाच्या प्रीमियरवेळी म्हणजे, ४ डिसेंबर रोजी चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये एका ३५ वर्षीय महिलेचा (एम रेवती) मृत्यू झाला. या घटनेनंतर अल्लू अर्जुनने दुख: व्यक्त केले होते. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत असून त्याने झालेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पुष्पा-२ फेम अल्लू अर्जुनने पोस्ट लिहिले होतं की, “एका थिएटरमध्ये दु:खद घटनेने खूप दु:खी झालो. या कठीण समयी परिवाराच्या प्रती माझ्या संवेदना आहेत. मी सांगू इच्छितो की, या दु:खात ते एकटे नाहीत आणि मी त्या परिवारालादेखील वैयक्तिकरित्या भेटेन. ...मी या कठिण प्रसंगी प्रवासातून जाताना मी त्यांना प्रत्येक प्रकारची मदत करण्यासाठी प्रतिबद्ध आहे.”
व्हिडिओमध्ये, अल्लू अर्जुनने संवेदना व्यक्त केल्या आणि परिवाराला आश्वासन दिलं की, तो ‘नेहमी त्यांच्यासाठी मदतीला असेल’. अल्लू अर्जुनने हेदेखील सांगितले की, ‘सद्भावना’ म्हणून २५ लाख रुपये मदत करत आहेत. सिनेमा पाहणाऱ्यांसाठी आवाहन केलं आहे की, थिएटर जाताना सावधानी बाळगावी.
अल्लू अर्जुनने या घटनेनंतर तेलंगणा उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. यात त्याने म्हटलं होते की, या घटनेत आपली कोणतीही चूक नाही. त्यावेळी मी दुर्दैवाने तिथे उपस्थित होतो.