मुंबई : पुढारी ऑनलाईन
छोट्या पडद्यावरील 'तुझ्या इश्काचा नादखुळा' या मालिकेत रघू हे पात्र साकारणारा संचित चौधरी चर्चेत आहे. त्याची 'तुझ्या इश्काचा नादखुळा' ही मालिका लोकप्रिय होत आहे.
पण, तुम्हाला माहित आहे का? या मालिकेतील रघू म्हणजेच अभिनेता संचित चौधरीने याआधीही मालिका केली आहे. संचित चौधरीच्या अभिनय प्रवासाविषयी माहिती आहे का?
संचित मुळचा नागपूरचा. वडिल शिक्षक असल्यामुळे संचितनेही शिक्षक व्हावं अशी त्यांची इच्छा होती.
संचितने सायकॉलॉजीमध्ये एम ए केलं आणि दोन वर्ष प्रोफेसर म्हणून नोकरीही केली. संचितला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.
टीव्हीवरचे कॉमेडी शोज पाहून तो स्क्रीप्ट लिहायचा आणि शाळेत परफॉर्म करायचा. दहावीनंतर मात्र त्याला काही स्पर्धांविषयी कळलं. मग त्याने नागपूरातला रंगरसिया थिएटर ग्रुप जॉईन केला.
त्यानंतर राज्यनाट्य, पुरुषोत्तम करंडक, प्रबोधन करंडक, सवाई, लोकांकिका या नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेत घेत तो मुंबईत पोहोचला.
मुंबईत पृथ्वी थिएटरमध्ये त्याने बरीच नाटके सादर केली. हिंदी आणि मराठीसाठी डबिंग आर्टिस्ट म्हणूनही त्याने काम केलं.
'प्रेमाचा गेम सेम टू सेम' मालिकेत दुहेरी व्यक्तिरेखा साकारल्यानंतर आता संचित तुझ्या इश्काचा नादखुळा या मालिकेत रघूच्या भूमिकेत दिसत आहे.
'रघू फक्त एकदाच सांगतो नाहीतर सरळ उलटा टांगतो' हे ब्रीदवाक्य घेऊन मनमौजी जगणारा रघु मुख्य भूमिका साकारतोय.