

Amruta Khanvilkar comment on Prasad Oak post
मुंबई: मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आहे. प्रसादच्या घरी एका गोंडस चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले असून, ओक कुटुंबीयांनी तिचे अत्यंत उत्साहात स्वागत केले आहे. ही नवी पाहुणी दुसर कोणी नसून एक कुत्र्याचे पिल्लू आहे.
प्रसाद ओकने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ओक कुटुंबीयांनी या नव्या सदस्याचे औक्षण केले आणि फुलांच्या पायघड्यांवरून घरात स्वागत केले. घराच्या उंबऱ्यावरून माप ओलांडून आणि या पिल्लाचे पाय उमटवून त्याचे नववधूप्रमाणे स्वागत करण्यात आले. "अजून एक मुलगी आली हो" असे कॅप्शन देत प्रसादने आपला आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे. "आमच्या या मुलीचं नाव बिस्कॉफ" असेही प्रसादने सांगितले आहे.
प्रसादने हा व्हिडिओ पोस्ट करताच अवघ्या काही मिनिटांत त्यावर लाईक्स आणि कमेंट्स सुरू झाल्या. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे यांनीही कमेंट केल्या आहेत. मात्र, अभिनेत्री अमृता खानविलकर हिची कमेंट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
पिल्लाचा निरागसपणा पाहून अमृतालाही आपला आनंद थांबवता आला नाही. तिने या व्हिडिओवर "अगं बाई..." अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. तिची ही कमेंट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून, चाहत्यांनीही या पिल्लाला "खूपच क्युट" असल्याचे म्हटले आहे.