नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला ७० वा वाढदिवस काल गुरुवारी (दि.१७) साजरा केला. याप्रसंगी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रांशी संबंधित असलेल्या दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या. याच दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर मात्र नरेंद्र मोदींनी खास असे अभिनंदन विराट आणि अनुष्काचे केले आहे.
अधिक वाचा :'उर्मिला मातोंडकर ही सॉफ्ट पॉर्न स्टार'
विराट कोहली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिलं होतं की, 'आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.' यानंतर प्रत्युत्तरादाखल नरेंद्र मोदींनी विराट कोहली आणि अनुष्काचे अभिनंदन केले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'धन्यवाद विराट कोहली. मी अनुष्का शर्मा आणि तुमचेही अभिनंदन करू इच्छित आहे. तसेच मला खात्री आहे की, आपण दोघेही एक आदर्श पालक बनाल.'
अधिक वाचा : नेहा धुपियाच्या प्रश्नांना सौरव गांगुली यांची मजेशीर उत्तरे
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने ही गुडन्यूज काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर शेअर केली होती. यावेळी दोघांनी एक फोटो शेअर केले होता. या फोटोसोबत अनुष्काने मातृत्वापेक्षा दुसरं काहीच श्रेष्ठ नसल्याचे सांगितले होते. तर 'आणि मग, आम्ही तीन! जानेवारी २०२१मध्ये आगमन होत आहे,' असे विराटने लिहिले होते.
(narendra Modi twittar वरून साभार)