Phullwanti : प्राजक्तासोबत गश्मीर महाजनी व्यकंटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्या भूमिकेत

प्राजक्तासोबत गश्मीर महाजनी व्यकंटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्या भूमिकेत
Phullwanti film
प्राजक्तासोबत गश्मीर महाजनी व्यकंटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्या भूमिकेत Gashmeer Mahajani
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्रपतींनंतर मराठा साम्राज्याची धुरा पेशव्यांनी अतिशय समर्थपणे सांभाळली. त्यांच्या दरबारात एकापेक्षा एक धुरंदर होते. त्यातील एक म्हणजे, सकल शास्त्रपारंगत व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री!. ‘फुलवंती’ या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी याने व्यंकट शास्त्री यांची भूमिका साकारली आहे.

श्रीमंतांच्या दरबारातील साक्षात बृहस्पती पेशव्यांच्या दरबारात त्यांना अनन्यसाधारण महत्त्व होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी चित्रपटरूपात आपल्यासमोर ११ ऑक्टोबरला भेटायला येणार आहे. यात व्यंकट शास्त्री यांची अतिशय सशक्त व्यक्तिरेखा; अभिनेता गश्मीर महाजनी याने साकारली आहे. सोबत ‘फुलवंती’ या मध्यवर्ती भूमिकेत चतुरस्त्र अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्याला पाहायला मिळणार आहे.

व्यंकट शास्त्री यांचे व्यक्तिमत्व, त्यांची बुद्धिमत्ता आणि चारही दिशांना पसरलेली त्यांची किर्ती हे सर्व आपल्याला या ऐतिहासिकपटातून पाहायला मिळणार आहे. शिक्षकदिनाच्या पार्श्वभूमीवर या व्यक्तिरेखेची झलक प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आली.

अभिनेता गश्मीर महाजनी याने आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मराठी चित्रपटांसह, हिंदी मालिका व रिअॅलिटी शोमधून लोकप्रियता मिळवणारा अभिनेता गश्मीर महाजनी ‘फुलवंती’ चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल तितकाच उत्सुक आहे. पेशवाई काळातील ‘फुलवंती’ नावाची सुप्रसिद्ध नर्तिका आणि प्रकांडपंडीत व्यंकट शास्त्री यांची ही दमदार कथा आहे. ‘फुलवंती’ चित्रपटाच्या निमित्ताने वेगळ्या धाटणीची भूमिका करत असल्याचा आनंद गश्मीरने व्यक्त केला.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली 'फुलवंती' ही अलौकिक कलाकृती चित्रपटरुपात चाहत्यांसमोर अवतरणार आहे.

हा चित्रपट पॅनोरमा स्टुडिओज सादर करत आहेत. ‘फुलवंती’ मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ही भव्य कलाकृती ११ ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे.

कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. अमोल जोशी प्रोडक्शन, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

Phullwanti film
कोल्हापुरात चित्रीकरण अन् चित्रपट हिट : रवींद्र महाजनी यांच्या आठवणींना उजाळा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news