Patri Sarkar 1942 Marathi movie| येतोय ‘पत्री सरकार १९४२’, ब्रिटिशांविरुद्धच्या संघर्षाची गाथा झळकणार रुपेरी पडद्यावर

येतोय ‘पत्री सरकार १९४२’, ब्रिटिशांविरुद्धच्या संघर्षाची गाथा झळकणार रुपेरी पडद्यावर
 Patri Sarkar 1942 Marathi movie
Patri Sarkar 1942 Marathi movie
Published on: 
Updated on: 

सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्याचा सुवर्णकाळ आणि ब्रिटिश सत्तेविरोधात क्रांतीसिंह नाना पाटील यांनी उभारलेल्या 'प्रतिसरकार'चा ज्वलंत इतिहास लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. ‘भागीरथी मोशन पिक्चर्स’च्या बॅनरखाली तयार झालेला हा बहुचर्चित मराठी चित्रपट येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकताच त्याचे पोस्टर लाँच करण्यात आले आहे.

 Patri Sarkar 1942 Marathi movie
Jailer 2 X Review: रजनीकांतचा ‘जेलर 2’ चित्रपट हिट की फ्लॉप? सोशल मीडिया युजर्सनी स्पष्टच सांगितलं, किती कोटी कमावणार?

या चित्रपटाच्या पोस्टरमधून स्वातंत्र्यपूर्व काळातील भूमिगत लढा, प्रतिसरकारचे कार्य आणि स्वातंत्र्यसैनिकांचे अफाट धैर्य स्पष्टपणे जाणवते. चित्रपटाची निर्मिती विशाल गोविंदराव जाधव यांनी केली आहे. मनीष अनसुरकर यांनी या चित्रपटाचे लेखन, गीतलेखन, संगीत आणि दिग्दर्शन केले आहे.

चित्रपटात अनिल राबाडे, अनुराधा धामणे, सिद्धार्थ बदी, शुभम गवई, रश्मी साळवी आणि तृप्ती शेडगे हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. विशेष म्हणजे, लोकप्रिय अभिनेता अंकित मोहन पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या भारदस्त आवाजातील निवेदन या चित्रपटाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. छायांकन संदीप वाटवे, परमहंस पाठक आणि सुमेध मराठे यांचे आहे. संकलन अनिल मोकल, पार्श्वसंगीत सौरभ लता शिवकुमार यांचे आहे.

 Patri Sarkar 1942 Marathi movie
Salman Khan: "माझ्या आयुष्यातील गुपिते माझ्यासोबतच कबरीत गाडली जातील"; सलमान खानने बायोपिकबाबत स्पष्टच सांगितलं

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news