

Parineeti Chopra Raghav Chadha Baby Neer Name: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्या घरी गेल्या महिन्यात लहान बाळाचे आगमन झाले. 19 ऑक्टोबर रोजी परिणीतीने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. आता बाळाला एक महिना पूर्ण होताच या दांपत्याने आपल्या लाडक्या मुलाच्या नावाचा आणि त्याच्या अर्थाचा खुलासा केला आहे. त्यासोबतच बाळाच्या छोट्या-छोट्या पायांचे सुंदर फोटोही शेअर केले आहेत.
परिणीती आणि राघव यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे “जलस्य रूपम्, प्रेमस्य स्वरूपम् – तत्र एव नीर.” म्हणजेच पाण्यासारखा निरागस, प्रेमासारखा शुद्ध. दोघांनी सांगितले की त्यांनी आपल्या मुलाचे नाव ‘नीर’ ठेवले आहे. याचा अर्थ शुद्ध, जीवन आणि पाणी.
परिणीती–राघव यांच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.
वरुण धवन, भारती सिंह, निमरत कौर, कनिका कपूर, सबा पटौदी, गौहर खान यांसह अनेक कलाकारांनी कमेंट करून जोडप्याला प्रेम आणि आशीर्वाद दिला.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी 2023 मध्ये उदयपूरमधील पिचोला तलावाच्या काठावर भव्य लग्न केले होते. दोघे वयाने जवळजवळ एकसमान आहेत आणि लग्नाआधी काही महिन्यांची त्यांची प्रेमकहाणी चर्चेत होती. आता त्यांच्या जीवनात ‘नीर’च्या आगमनाने हा आनंद अधिक वाढला आहे.