Pandharinath Kamble Marathi Big Boss
पंढरीनाथ कांबळेचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रवेश; खऱ्या पॅडीची ओळख होणार Pandharinath Kamble

पंढरीनाथ कांबळेचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रवेश; खऱ्या पॅडीची होणार ओळख

पंढरीनाथ कांबळेचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रवेश
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे लाडका पॅडी अर्थात पंढरीनाथ कांबळे यांने यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रवेश केला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात जाण्याआधी पॅडी म्हणाले की,"बिग बॉस मराठी' या कार्यक्रमात मी जसा आहे तसाच राहणार आहे.

''पैसे आणि संपत्ती मिळवणे हे महत्वाचे नाही, तर मी एक चांगला माणूस म्हणून ओळखला जाणं हेच माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. या शोसाठी मी कोणतीही स्ट्रॅटेजी तयार केली नाही. कारण माझ्या मते 'बिग बॉस मराठी'च्या घरात कोण कसं वागेल? हे सांगणं अवघड आहे. मी माझे मत मांडेन तसेच तिथे स्टॅन्ड घेईन, चिडेन, ओरडेन, पण समजुतीने परिस्थिती हाताळीन".

पॅडीने 'बिग बॉस मराठी'मध्ये जाण्याबाबत त्याच्या घरच्यांना सांगितलं तेव्हा त्याच्या मुलींनी त्याला आनंदाने पाठिंबा दिला. यावेळी पॅडी म्हणाला की, "ट्रॉफी घेऊन या", असं मला घरच्यांनी सांगितलं. मला वाटतं की, ''बिग बॉस मराठी' हा फक्त भांडणांचा खेळ नाही आहे. खऱ्या माणसांचं रूप याच घरात दिसतं. लोक बाहेरच्या जगात मुखवटे घालून फिरतात. आता या घरात प्रेक्षकांना माझ्या व्यक्तिमत्त्वाचं खरं रूप पाहायला मिळणार आहे".

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये पंढरीनाथ कांबळे कशी त्याची चमक दाखवतोय हे पाहाणं उत्सुकतेचे ठरणार आहे.

Pandharinath Kamble Marathi Big Boss
जोडी की बेडी : बिग बॉस मराठी-३ च्या घरात होणार ‘हल्लाबोल’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news