Panchayat Season 4 X Review: ‘पंचायत सीझन 4’ आला रे! सोशल मीडियावर प्रेक्षकांनी किती स्टार्स दिले, वेबसीरिज बघावी का?

मंजू देवी आणि क्रांती देवी यांच्यातील टक्कर या कथानकाभोवती चौथे सीझन फिरत असले तरी चाहत्यांमध्ये मात्र या सीझनबाबत संमिश्र प्रतिक्रिया
Entertainment News
पंचायत सीझन 4pudhari
Published on
Updated on

मुंबई : पंचायत सीझन 4 ओटीटीवर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चाहत्यांनी नव्या सीझनवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. निवडणुकीच्या मैदानात मंजू देवी आणि क्रांती देवी यांच्यातील टक्कर या कथानकाभोवती चौथे सीझन फिरत असले तरी चाहत्यांमध्ये मात्र या सीझनबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे.

सोशल मीडियावर पंचायत 4 बाबत प्रेक्षक काय म्हणाले?

अश्विनी कुमार धीर याने X पोस्टमध्ये Review दिला आहे. तो म्हणतो, सीझन ४ मध्ये ग्रामीण भारताची निरागसता दिसत नाही. राजकारणावर खूपच जास्त भर दिला आहे. सीरिजचा शेवट हा अपेक्षाभंग करतो. विनोदाचा अभाव आणि लांबलेलं कथानक यामुळे कंटाळा येतो. एकंदरित सीरिज ठीकठाक आहे असंच म्हणावं लागेल.

Srkzsanajy नावाच्या x युजरने सर्वच कलाकारांनी दमदार अभिनय केल्याचं म्हटले आहे. मात्र, कथानक कुठेतरी खेचलंय, विनोदाचा तडकाही कमी असल्याचे युजरचं म्हणणं आहे.

Sunny या युजरने म्हटले आहे की, निवडणुकीच्या कथानकात उपाहासाचा तडका गरजेचा होता. पण पंचायत सीझन 4 चं पटकथा खूपच गंभीर पद्धतीने मांडलीये. सीरिजमधले सीन मनाला भावतात. काही चांगले सीनही आहेत, एकंदरित सीरिज पाहताना फार चांगला अनुभव आला नाही.

Keion Talkz या युजरने पंचायतच्या चौथ्या सीझनला साडे तीन स्टार दिले आहेत. जितेंद्र कुमारने दमदार अभिनय केला आहे, कथानकात रंजक वळणं आहेत त्यामुळे उत्सुकता वाढत जाते, असं त्या युजरने म्हटलंय.

𝙒𝙞𝙣𝙩𝙧𝙚𝙭𝙭𝙯 या युजरने पंचायत सीझन ४ हा स्टोरीटेलिंगचं उत्तम उदाहरण आहे. शेवटच्या भागातल्या घटना डोळ्यात पाणी आणतात. आता पाचव्या सीझनची उत्सुकता असून शक्य तितक्या लवकर पाचवा सीझन आणावा, अशी विनंतीही युजरने सीरिजच्या निर्मात्यांना केली आहे.

चौथ्या सीझनमध्ये काय पहायला मिळणार?

तिसरा सीझन जिथे संपला तिथूनच चौथ्या सीझनची सुरूवात होते. प्रधानजींना गोळी लागल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असते. सचिवजींवर गुन्हा दाखल झाला असतो आणि दुसरीकडे बनराकसचे राजकीय खेळी जोर धरू लागतात. प्रत्येक एपिसोडमध्ये नवीन घटना घडतात आणि उत्सुकता वाढत जाते. मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोणी फुकट बटाटे वाटतंय तर कोणी मोफत वीजेचं आश्वासन देतंय. ग्रामीण भागात राजकारण कसं सुरू असतं हे सीरीजमध्ये बघायला मिळते. आता प्रधानजी निवडणूक जिंकतात, फुलेराचे सचिवजी एमबीएच्या परीक्षेत पास होतात का, त्यांच्या लव्हस्टोरीचं पुढे काय होतं या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी असतील तर तुम्हाला वेबसीरिज बघावी लागेल.

पंचायत सीझन 4 मध्ये एकूण किती एपिसोड आहेत?

पंचायत सीझन 4 मध्ये एकूण 8 एपिसोड्स आहेत. प्रेक्षकांना Amazon Prime Video वर ही वेबसीरिज पाहता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news