

श्वेता तिवारीची मुलगी आणि अभिनेत्री पलक तिवारी हिने अल्पावधीतच इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पलक ही केवळ तिच्या प्रोजेक्टस्मुळेच नाही, तर सतत चर्चेत राहणार्या तिच्या फॅशन स्टेटमेंटस् आणि बोल्ड लूकमुळेही ट्रेंडमध्ये असते. 20 वर्षीय पलक तिवारी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. तिचे ग्लॅमरस फोटो आणि स्टायलिश लुक्स चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. नुकतेच पलकने डीप नेकलाईन असलेल्या फ्लोरल गाऊनमधील काही नवीन फोटो शेअर केले असून त्यावर चाहत्यांची नजर थांबून राहिली आहे.
या गाऊनमध्ये पलक अक्षरशः एखाद्या राजकुमारीसारखी दिसत आहे. फोटोशूटदरम्यान पलकने अनेक वेगवेगळ्या अँगलमधून पोझ दिल्या आहेत. फ्लोरल प्रिन्सेस गाऊनसोबत तिने केसांत मेसी बन केला असून तो तिच्या लूकला अप्रतिमपणे पूरक ठरत आहे. मेकअपमध्ये तिने डोळ्यांना कॅटी आयशॅडो लूक दिला आहे. आयलाईनर आणि मस्कार्याने डोळ्यांना डिफाईन करत, न्यूड लिपस्टिकने संपूर्ण मेकअपला परिपूर्ण फिनिश दिला आहे. पलकच्या या ग्लॅमरस अंदाजावर सोशल मीडियावर चाहते अक्षरशः फिदा झाले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत असून सर्वजण तिच्या सौंदर्याची आणि शैलीची प्रशंसा करत आहेत.