तेजस्विनी पंडितचा 'येक नंबर' दसऱ्याच्या मुहुर्तावर

'येक नंबर' बदलणार मराठी चित्रपटांची रूपरेषा
तेजस्विनी पंडितचा 'येक नंबर' दसऱ्याच्या मुहुर्तावर
तेजस्विनी पंडितचा 'येक नंबर' दसऱ्याच्या मुहुर्तावर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित, राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर दिग्दर्शित 'येक नंबर' येत्या १० ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाशी इतके दिग्गज जोडले गेले आहेत की, चित्रपटाच्या घोषणेपासूनच याची जोरदार चर्चा सुरु होती. त्यात काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरने ही उत्सुकता अधिकच वाढवली. प्रेक्षकांना या पोस्टरमधील तरुण कोण?, हे जाणून घेण्याची प्रचंड इच्छा होती. तर आता या गोष्टीवरून पडदा उठला असून हा रांगड्या व्यक्तिमत्वाचा तरुण धैर्य घोलप असल्याचे समोर आले आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये चित्रपटाचा नायक धैर्य घोलप एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळत असून, त्याच्या देहबोलीतूनच मनातील क्रोध व्यक्त होत आहे. याव्यतिरिक्त या पोस्टरमध्ये लक्षवेधी ठरत आहे, ती एक करारी नजर, जी महाराष्ट्राच्या परिचयाची आहे. या सगळ्यात अधिक भर घालत आहे, ते गूढ, रहस्यमयी संगीत. त्यामुळे या सगळ्यामागे नेमके काय दडले आहे, हे जाणून घेण्यासाठी मात्र, थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

तेजस्विनी पंडित आणि वरदा साजिद नाडियाडवाला ह्या 'येक नंबर' चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. तर या चित्रपटाला, मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीला आपल्या संगीतावर ठेका धरायला लावणारे, अजय -अतुल यांचे धमाकेदार संगीत लाभले आहे. या चित्रपटाच्या छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे.

बहुप्रतीक्षित असलेला "येक नंबर' हा चित्रपट १० ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दसऱ्याच्या सोन्यासोबत चित्रपटाचाही आनंद प्रेक्षकांना लुटता येणार आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी सांगितले आहे की, "या चित्रपटासाठी मला एक असा नवीन चेहरा हवा होता, जो प्रेक्षकांना आपल्यातलाच एक वाटेल. त्यामुळे धैर्यचा रांगडा लूक मला या व्यक्तिरेखेसाठी अतिशय योग्य वाटला. त्यानेही या व्यक्तिरेखेला उत्तम न्याय दिला आहे.''

निर्माती तेजस्विनी पंडित म्हणाली की, ''प्रेक्षकांची अनेकदा तक्रार असते की, मराठी चित्रपटांमध्ये तांत्रिकदृष्ट्या, सादरीकरणात भव्यता नसते. हाच समज दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या चित्रपटात अनेक कुशल, सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञांचा सहभाग आहे. ही भव्यता प्रेक्षकांना पडद्यावर नक्कीच दिसेल. या सगळ्याचे श्रेय या चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला जाते.''

तेजस्विनी पंडितचा 'येक नंबर' दसऱ्याच्या मुहुर्तावर
Marathi Movie |तेजस्विनी पंडितचा 'येक नंबर' या दिवशी होणार प्रदर्शित

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news