

हॉलिवूडमध्ये अगदी कमी बजेटमध्ये तयार झालेला व जगभरात प्रचंड गाजलेला हॉलिवूड चित्रपट म्हणजे ऑब्सेशन OBSESSION. या चित्रपटाची जगभरात चर्चा झाली आता. प्रेमाचा अतिरेक झाला की किती भयानक परिणाम होतात हे दाखवणारा हा सायको थ्रिलर आहे. हा चित्रपट ऑफिशीअली हिंदी भाषेत डब होणार असून या डंबीग बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी क्रिती सेनन व वरुण धवन करणार आहेत. या मुळ चित्रपटातील वरुणने 'बेअर', तर क्रितीने 'निक्की' या व्यक्तिरेखेसाठी डबिंग केले आहे. त्यामुळे या चित्रपटाला बॉलिवूडचा खास तडका मिळणार आहे.
या चित्रपटासाठी केला सिल रिक्रेएशन
या डब चित्रपटाच्या निमित्ताने नुकतीच मुळ ऑब्सेशन चित्रपटातील एक सिन रिक्रिएशन केला आहे. या चित्रफितीचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. यात वरुण आणि क्रिती यांच्या आवाजातील संवादांची झलक पाहायला मिळते. क्रितीचा बदलत जाणारा मूड व वरुणचा धक्का बसलेला चेहरा पाहून मूळ चित्रपटाची झलक दिसते.
'ऑब्सेशन' हा चित्रपट डिस्ने हॉटस्टारवर आज 30 ऑक्टोबर रोजी डिजिटली प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये पाहता येणार आहे.
हॉरर, थ्रिलर, लव्ह, सस्पेन्स सुपरनॅचरल अशा गोष्टींचा भरणा
Obsession हा मुळ चित्रपट करी बार्कर (Curry Barker) यांचा असून त्यांनी दिग्दर्शक व लेखक अशी दुहेरी भूमिका निभावली आहे. यामध्ये मायकल जॉन्स्टन (Michael Johnston) – 'बेअर' (Bear Bailey) ची मुख्य भूमिका. इंडे नॅव्हारेट (Inde Navarrette) 'निक्की' (Nikki) ची मुख्य भूमिका. साकारली आहे सुपरनॅचरल हॉरर आणि डार्क सायकोलॉजिकल रोमान्स अशा पठडीतला हा चित्रपट आहे . ही कथा 'बेअर' आणि 'निक्की' या प्रेमी युगुलाभोवती फिरते. प्रेमाचे रूपांतर एका अस्वस्थ आणि भयानक वेडात (Obsession) कसे होते, हे थ्रिलर व गूढ घटकांसह चित्रपटात मांडले आहे.
गुरुवारी 'जिओहॉटस्टार'ने (JioHotstar) या कलाकारांचा चित्रपटातील एक प्रसंग रिक्रिएट करतानाचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून, अनेकांनी क्रितीच्या अभिनयाची प्रशंसा करत तिला आणखी आव्हानात्मक भूमिकांमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच हा प्रोमो पाहून अनेकांनी रोमांच अनुभवला असल्याचेही सोशल मिडीयावर शेअर केले आहे.
या रिक्रिएशन व्हिडिओमध्ये दोन्ही कलाकार झळकले असले, तरी बहुतांश प्रेक्षकांनी क्रितीच्या अभिनयाकडे आणि तिच्या वैविध्यपूर्ण शैलीकडे विशेष लक्ष वेधले. काहींनी तर असेही म्हटले की, एक अभिनेत्री म्हणून क्रितीच्या पूर्ण क्षमतेचा बॉलिवूडने अद्याप पुरेपूर वापर केलेला नाही.