

पुढारी ऑनलाईन डेस्क : बेली डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेहीने नुकतेच तिच्या मानलेल्या भावाच्या लग्नाला रत्नागिरीत हजेरी लावली आहे. खास करून नोराने बिझी शेड्युलमधून वेळात-वेळ काढून मुंबई ते रत्नागिरी असा रेल्वेने प्रवास केला आहे. याशिवाय तिने मानलेला भाऊ किंवा मित्रासोबत त्याच्या कुटूबियांसोबत हळदी संभारंभ कार्यक्रमात सहभागी झाली आहे. याशिवाय नोराने लग्नातील खास गाण्यावर ठेकाही धरला आहे.
बॉलिवूडची डान्सर नोरा फतेही तिच्या मानलेल्या भाऊ आणि कॅमेरामॅन अनुप सुर्वे यांच्या लग्नाला रत्नागिरीत मोठ्या दिमाकात हजेरी लावली आहे. या लग्न सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी तिने चक्क मुंबई ते रत्नागिरी अशा ट्रेनने प्रवास केलाय. दरम्यान तिने हळदी सभारंभ आणि लग्नातील काही लग्नातील फोटो आणि व्हिडिओ स्वत : च्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात ती अनुपसह त्याच्या कुटूंबियांना हळद लावताना दिसतेय. नोराला आहेर म्हणून एक पिवळ्या कलरची साडीही देण्यात आली आहे. दरम्यान नोराने कोकणातील गाणी आणि मराठी गाण्यावर धमाकेदार डान्स केला आहे.
एकिकडे नोराचे छोट्याशा गावात लग्नाला आल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. तर दुसरीकडे नोराने केलेल्या डान्सने तिच्या आजूबाजूचे चाहते आणि लग्नातील नातेवाईक भारावून गेलं आहेत. यावेळी नोराने चकचकीत पिवळ्या कलरच्या साडीवर तिने त्याच रंगाचे ब्लॉऊज परिधान केलंय. मोकळे केस, कानात मोठे इअररिग्स, हातात ब्रेसलेट आणि अंगठी, लिपस्टिक आणि मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय. नोराचे हे व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत. दरम्यान व्हिडिओ, फोटो पाहून नोरा खूप साधी असल्याचे म्हटलं जात आहे.