पुढारी ऑनलाईन डेस्क
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) त्यांच्या फिटनेस आणि डान्स मूव्हजसाठी ओळखल्या जातात. अशा परिस्थितीत दोन्ही अभिनेत्री एकत्रित स्टेज साकारत असतील तर मग धमाका निश्चित असतो. असाच दोघींचा एक थ्रोबॅक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये नोरा फतेही आणि मलायका अरोरा एका डान्समध्ये एकमेकांना जोरदार टक्कर देताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईस देखील दिसत आहे.
नोरा फतेही आणि मलायका अरोराचा हा डान्स व्हिडिओ टीव्ही रिॲलिटी शो 'इंडियाज बेस्ट डान्सर' चा आहे. दरम्यान, चाहत्यांच्या मागणीनुसार दोन्ही अभिनेत्रींनी हृतिक रोशनच्या 'बँग बँग' गाण्यावर एकत्र डान्स केला. दोन्ही व्हिडिओंवर चाहते जबरदस्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. आतापर्यंत डान्सचा व्हिडिओ ४९ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ सेट इंडियाच्या अधिकृत यूट्यूब वाहिनीवर पोस्ट करण्यात आला आहे.
नोरा फतेहीच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झाल्यास काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचे 'नाच मेरी रानी' हे गाणे रिलीज झाले होते. नोरा फतेही आणि गुरु रंधावा यांचे हे गाणे आतापर्यंत २० कोटींपेक्षा जास्त पाहिले गेले आहे. नोरा फतेही लवकरच 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' मध्येही दिसणार आहे. त्याचवेळी मलायका अरोराबद्दल बोलायचं झाल्यास तिला शेवटच्यावेळी इंडियाज बेस्ट डान्सरमध्ये जज म्हणून दिसली होती. मलायका अरोरा कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे तिला हा शो मध्येच सोडावा लागला होता. नंतर त्याची जागा नोरा फतेहीने घेतली. मात्र मलायका अरोराने कोरोना मधून सावरल्यानंतर या शोमध्ये जबरदस्त पुनरागमन केले.